News Flash

बॉलिवूडमधली ही अभिनेत्री कंगनाला सर्वाधिक प्रिय

ती एक प्रेरणादायी स्त्री आहे असं म्हणत कंगनानं तिचं कौतुक केलं आहे.

कंगना

अभिनेत्री कंगना रणौत हिचा बॉलिवूड द्वेष जगजाहीर आहे. बॉलिवूडमधले अनेक कलाकार तिच्या ‘हिट लिस्ट’वर आहेत. यात करण जोहर, हृतिक रोशन, आलिया रणबीरपासून ते खान मंडळींचाही समावेश आहे. मात्र संपूर्ण बॉलिवूडमध्ये कंगनाला एक अभिनेत्री मात्र खूपच आवडते. तिच्यापासून मला प्रेरणा मिळते असं कंगना जाहिरपणे सांगते. ही अभिनेत्री म्हणजे करिना कपूर खान होय.

‘करिना ही प्रेमळ आहे. जर अभिनेत्री, पत्नी आणि आई असावी तर ती करिनासारखी. ती एक परिपूर्ण स्त्री आहे. ती नेहमीच मला प्रोत्साहन देते. करिना एक प्रेरणादायी स्त्री आहे. ती मला सकारात्मक संदेश पाठवते. अशा शब्दात कंगनानं करिनाचं कौतुक केलं आहे.

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत करिनानं देखील कंगनाच्या कामाचं कौतुक केलं होतं. कंगनाची बायोपिक पाहण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे असं करिना म्हणाली होती. तसेच मणिकर्णिकाच्या यशाबद्दल करिनानं कंगनाला भरभरून शुभेच्छाही दिल्या होत्या. कंगना ही नेहमीच बॉलिवूड कलाकारांवर सडेतोड टिका करते मात्र करिनावर तिनं कौतुकाचा वर्षाव केला आहे हे पाहून बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांच्या भुवया उंचावल्या नसल्या तर नवल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2019 11:14 am

Web Title: kangana ranaut is all praises for kareena kapoor khan during the manikarnika success bash
Next Stories
1 अमिताभ बच्चन यांनी विकली ‘रॉल्स रॉयस’ गाडी, १२ वर्षापूर्वी मिळाली होती भेट
2 कंगनासारखं बोलणं मला जमत नाही, आलियाचा पलटवार
3 Photo : कर्करोगावर मात केल्यानंतर सोनालीचे फोटोशूट, दाखवला २० इंचाचा कट
Just Now!
X