News Flash

ट्विटरनंतर इन्स्टाग्रामवर कंगनाची टीका; ” जिहादींचा ताबा….पुढील निवडणुकीत भाजपला धोका”

"कम्युनिस्ट आणि जिहादींनी ताबा मिळवलाय."

सोशल मीडियावर वादग्रस्त व्यक्तव्य करण्यासाठी अभिनेत्री कंगना रणौत ओळखली जाते. बॉलिवूडसह देशातील विविध घडामोडींवर ती भाष्य करते. सोशल मीडियावरील पोस्टमुळे तिला अनेकदा ट्रोल व्हावं लागतं. एवढचं नव्हे तर टीका करण्यासाठी ट्विटरचा वापर करत असतानाच कंगनाने ट्विटरच्या धोरणांवरदेखील सवाल उपस्थित केले होते. त्यानंतर आता कंगनाने इन्स्टाग्रामवरील कंटेंन्टवर नाराजी व्यक्त केली आहे.

कंगनाने एक ट्विट करत विरोधक इन्स्टाग्रामचा वापर चुकीच्या गोष्टींसाठी करत असल्याचं ती म्हणाली आहे. कंगनाने दोन ट्विट केले आहेत. या पहिल्या ट्विटमध्ये ती म्हणाली, “इन्स्टाग्राम मूर्ख लोकांनी भरलेलं असू शकतं . इथे बुद्धिमत्ता नसलेल्यांची कमी नाही. चांगली गोष्ट फक्त ही आहे की इथे छोट्या व्यवसायांना संधी मिळते. मात्र विरोधक आता याचा वापर स्वत: साठी करू लागले आहेत. हे अशा मुर्खांनी भरलंय़ जे पाश्चिमात्यांचा प्रचार करत भाजपाविरोशी द्वेष पसरवत आहेत. ”

तर दुसऱ्या ट्विटमध्ये कंगनाने इन्स्टाग्रामवरील रील्सवरून निशाणा साधला आहे. ती म्हणाली, “हे मध्यम वर्गीयांचं टिकटॉक आहे. या मुर्खांवर भांडवलदार, कम्युनिस्ट आणि जिहादींनी ताबा मिळवलाय. जपला २०२४ च्या निवडणुकीसाठी ते घातकं ठरू शकतं. हे जोकर फॅशनच्या नावाखाली शर्टच्या खाली सायकलिंग शॉर्ट्स घालू शकतात, त्यामुळे त्यांना कुणीही सहज भुरळ घालू शकतं.”

युजरच्या ‘त्या’ कमेंटवर तापसी पन्नू भडकली; “मूर्खपणा कमी करा”

ट्विटरवर साधला होता निशाणा

या आधी कंगनाने ट्विटरचे सीईओ जॅक डॉर्जी यांना टॅग करत टीका केली होती. “तुम्ही इस्लामिक देश आणि चिनी प्रचारासाठी तुम्ही विकले गेले आहात. तुम्ही फक्त तुमच्या फायद्यासाठी स्टॅण्ड घेता. इतरांच्या विचारांबद्दल असहिष्णुता दर्शविता. ही लाजीरवाणी गोष्ट आहे”. असं म्हणत तिने ट्विटरच्या धोरणांवर नाराजी दर्शवली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2021 11:34 am

Web Title: kangana ranaut lashes out on instagram said instagram is threat for bjp for next election kpw 89
Next Stories
1 “इरफान सरांनी माझ्यासोबत काम करण्यास नकार दिला होता”, कंगनाचा खुलासा
2 हटके फोटो शेअर करत अमिताभ यांनी दिला मास्क घालण्याचा सल्ला
3 ‘म्हणून मुलींवर बलात्कार होतात’, कपड्यांवरुन ट्रोल करणाऱ्याला अभिनेत्रीने दिले उत्तर म्हणाली…
Just Now!
X