बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आपल्या वादग्रस्त विधानांमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. अनेकदा यामुळे तिच्यावर ट्रोल होण्याची वेळ देखील आली आहे. परंतु यावेळी कंगना आपल्या बहिणीमुळे चर्चेत आहे. तिने बहिण रंगोल चंडेलसाठी एक नवं घर डिझाईन केलं आहे. या आलिशान घराचा व्हिडीओ सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
रंगोलीने या नव्या घराचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये कंगना इंटिरिअर डिझार्नसला मदत करताना दिसत आहे. “जेव्हा कंगनाने मला विचारलं होतं, तुला कशा प्रकारच्या घरात राहायला आवडेल, तेव्हा मी म्हणाले होते मला एका सुंदर घरात राहायचंय. मला जुन्या वस्तू खूप आवडतात. जुन्या आणि नव्या वस्तुंचा योग्य संगम जिथे असेल अशा घरात मला राहायला आवडेल. कंगना कित्येक दिवस माझ्या या स्वप्नावर काम करत होती. आज मी तिला फिनिशिंग करताना पाहिलं. समोरील दृश्य पाहून मी दंग झाले. मी फक्त एवढंच सांगेन हे घर नाही माझ्यासाठी हा स्वर्ग आहे.” अशा आशयाची कॉमेंट लिहून रंगोलीने कंगनाचे आभार मानले आहेत.
रंगोलीच्या या नव्या घराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी कंगनाने देखील आपल्या नव्या घराचे फोटो पोस्ट केले होते. हे घर जवळपास ४८ कोटी रुपयांचे असल्याचे म्हटले जात होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 30, 2020 6:33 pm