अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री कंगना रणौतने बॉलिवूडमधील दिग्गज चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांवर निशाणा साधला होता. तसेच सुशांतने बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून आत्महत्या केल्याचे तिने म्हटले होते. आता पुन्हा एकदा कंगना तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. यावेळी तिने केलेले आरोप सिद्ध करुन दाखवले नाहीत तर पद्मश्री हा पुरस्कार परत करण्याचे खळबजनक विधान केले आहे.

नुकताच कंगनाने रिपब्लिक टीव्हीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने ‘मुंबई पोलिसांनी मला बोलवले होतो. पण मी मनालीमध्ये असल्यामुळे कोणाला तरी माझा जबाब रेकॉर्ड करण्यासाठी पाठव अशी मी त्यांचाकडे मागणी केली. पण माझ्या विनंतीनंतर मला मुंबई पोलिसांकडून काहीच उत्तर मिळाले नाही. मी तुम्हाला सांगते, जर मी असे काही बोलले असेल जे मला सिद्ध करुन दाखवता येणार नाही. तर मी माझा पद्मश्री हा पुरस्कार तुम्हाला परत करेन’ असे कंगना म्हणाली.

पाहा : २५० कोटींची मालकीण माधुरी दीक्षित राहते मुंबईतील आलिशान बंगल्यात, पाहा फोटो

सुशांतच्या आत्महत्येनंतर कंगना रणौतने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये तिने सुशांतचा बळी हा इमोशनल, सायकोलॉजिकल आणि मेन्टल लिंचिंगमुळे गेला असा आरोप केला होते.

काय म्हणाली आहे कंगना ?
“सुशांतसिंग राजपूतच्या हत्येनंतर अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. काही गोष्टी मी वाचल्या तर काही मी पाहिल्या आणि ऐकल्या आहेत. बॉलिवूडमध्ये त्याच्यासोबत जे काही घडत होते त्यामुळे तो त्रस्त झाला होता असे सुशांतच्या वडिलांनी एका मुलाखतीत सांगितले. अभिषेक कपूर या दिग्दर्शकासोबत सुशांतने केदारनाथ नावाचा सिनेमा केला होता. त्यांनी असे म्हटले आहे की सुशांतचे मानसिक आरोग्य हळूहळू बिघडवण्यात आले. तर अंकिता लोखंडे जिने सुशांतसोबत दीर्घकाळ काम केले तिने सुशांत सामाजिक स्तरावर त्याचा झालेला अपमान आणि बदनामी सहन करु शकला नाही असे म्हटले आहे. बॉलिवूडच्या मू्व्ही माफियांनी अत्यंत पद्धतशीरपणे सुशांतची बदनामी केली. त्याचे नाव न घेता त्याला अप्रत्यक्षपणे वाळीत टाकण्याचे प्रकार सुरु केले. ज्यामुळे हळूहळू सुशांत नैराश्याच्या गर्तेत ढकलला गेला. अनेक सो कॉल्ड पत्रकारांनी त्याच्याबद्दलच्या खोट्या बातम्याही पसरवल्या.” असे म्हणत कंगनाने काही वृत्तपत्रांच्या नावांचाही उल्लेख केला होता.