News Flash

कंगनाच्या सुरक्षेसाठी आईने केली पूजा; पाहा व्हिडीओ

कंगनाने सोशल मीडियावर पोस्ट केला व्हिडीओ

बॉलिवूडची ‘क्वीन’ अर्थात अभिनेत्री कंगना रणौतसाठी तिच्या आईने पूजा केली आहे. या पूजेचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत कंगनाने याबद्दलची माहिती दिली. कंगनाच्या सुरक्षेसाठी महामृत्यूंजय मंत्राचा जप तिच्या घरी करण्यात आला.

‘माझी आई माझ्या सुरक्षेविषयी चिंतेत असते. त्यामुळे तिने एक लाख पंधरा हजार महामृत्यूंजय मंत्राचा जप केला. ही पूजा आज संपन्न झाली. मी माझ्या कुटुंबीयांची आभारी आहे’, असं कंगनाने व्हिडीओ पोस्ट करत म्हटलं. या व्हिडीओत कंगना पूजा करताना दिसत आहे. तिच्यासोबत तिची आई आणि तिचा छोटा भाचासुद्धा पूजेत मग्न आहेत.

गेल्या काही दिवसांपासून कंगना फार चर्चेत आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणानंतर तिने अनेकांवर आरोप केले. बॉलिवूडमधल्या घराणेशाहीचा वाद सुरू झाला आणि त्यानंतर तापसी पन्नू, स्वरा भास्कर, रिचा चड्ढा यांच्याशीसुद्धा कंगनाची शाब्दिक बाचाबाची झाली. काही दिवसांपूर्वी कंगनाच्या मनाली इथल्या राहत्या घराबाहेर काही अज्ञात लोकांनी गोळीबारसुद्धा केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2020 11:11 am

Web Title: kangana ranaut mother organises puja for her safety see pic ssv 92
Next Stories
1 ‘अभय 2’ मधील ‘त्या’ फोटोप्रकरणी Zee 5 ने मागितली माफी, म्हणाले…
2 गुंजनबरोबर काम केलेल्या महिला पायलटचे पत्र : करणवर खोटी माहिती पसरवण्याचा आरोप तर जान्हवीला दिला सल्ला
3 खुदीराम बोस यांचा फोटो गुन्हेगारांच्या बोर्डावर; नेटकऱ्यांकडून #BoycottZee5 ची मागणी
Just Now!
X