समाजमाध्यमांवर नसतानाही अभिनेत्री कं गना राणावत नावाचे वादळ बॉलिवूडवर सतत भिरभिरत राहिले होते. आता तर सुशांत सिंह राजपूत प्रकरणात समाजमाध्यमांची ताकद काय आहे हे पहिल्यांदाच लक्षात आल्याचे सांगत कंगनाने समाजमाध्यमांवर पदार्पण के ले आहे. गेली अनेक वर्ष इंडस्ट्रीत असूनही इतर सहकलाकारांप्रमाणे तिने समाजमाध्यमांवरून बोलणे टाळले होते. आजवर कं गनाची बहीण रंगोली आणि तिच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांचा ताफाच तिचे म्हणणे सर्वदूर पोहोचवत आला आहे. मात्र आपण समाजमाध्यमांवर नाही याचा फायदा घेत अनेकांनी आपल्याला नावे ठेवली आहेत, असे सांगत अप्रत्यक्षपणे आता या सगळ्यांचा समाचार घ्यायची वेळ आली आहे, असा इशाराच कं गनाने देऊन टाकला आहे.

आपण समाजमाध्यमांवर आलो आहोत, हे एका व्हिडिओच्या माध्यमातून कं गनाने जाहीर के ले आहे. गेली पंधरा वर्ष मी या इंडस्ट्रीत आहे. या एवढय़ा वर्षांत वेगवेगळ्या ब्रॅण्ड्स, एजन्सीची कित्येक कोटींची कामे मी नाकारली कारण समाजमाध्यमांवर असणे ही त्यांची अट होती. मला समाजमाध्यमांवर यायची गरज कधीच वाटली नाही, मी माझ्या चाहत्यांपासून दूर आहे आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी समाजमाध्यमांवर यायला हवं, असं मला कधी वाटलंच नाही. त्यामुळे मी समाजमाध्यमांवर आले नाही, असे कं गनाने म्हटले आहे. मला लोकांना जे सांगायचं आहे ते मी माझ्या चित्रपटांमधून सांगत आले आहे. मी माझ्या चित्रपटांमधून महिला सक्षमीकरणावर भाष्य के लं, मी राष्ट्रवादाबद्दल बोलले. मी कलाकार आहे, मी माझ्या कलेतून व्यक्त झालं पाहिजे, मला व्यक्त होण्यासाठी समाजमाध्यमांची गरज नाही, अशी माझी धारणा होती, असे ती म्हणते. मात्र आपण समाजमाध्यमांवर नाही याचा अनेकांनी गैरफायदा घेतला. अनेकांनी मी चेटकीण आहे वगैरे शब्दांत माझ्यावर टीका के ली, असा आरोपही कं गनाने या व्हिडिओत के ला आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ज्या पध्दतीने सगळे एकत्र आले आणि समाजमाध्यमांवरूनही याबद्दल आवाज उठवला गेला. अखेर त्यात यश आले. समाजमाध्यमांमध्ये असणारी ताकद पाहून मी प्रभावित झाले आणि म्हणूनच या माध्यमांवर येत असल्याचे कं गनाने सांगितले आहे. मी ट्विटरपासून सुरूवात केली आहे आता या माध्यमातून पुन्हा एकदा चाहत्यांशी संवाद वाढेल, अशी अपेक्षाही कंगनाने व्यक्त के ली आहे.