News Flash

माझ्या प्रियकरांनीच मला कायम दगा दिला: कंगना रणौत

मागील १५ वर्षांतील रिलेशनशिप्सबद्दल बोलली कंगना

कंगना रणौत

अभिनयात क्वीन असणाऱ्या कंगना रणौतने आपल्या आयुष्यात अनेकांकडून फसवणूक सहन केली आहे. तिला अनेकांनी नाकारले आहे. पण कंगनाने मात्र कोणासोबतही असे केले नाही. याशिवाय स्वरा भास्करने पद्मावत सिनेमाशी निगडीत तिची मतं मांडली याबद्दलही कंगनाने आनंद व्यक्त केला. कंगना काही दिवसांपूर्वी हृतिक रोशनसोबतच्या वादामुळे चर्चेत आली होती. कंगनाने हृतिकवर अनेक गंभीर आरोपही केले. हृतिक आणि कंगनाच्या आयुष्यातील हा सर्वात मोठा वाद ठरला होता. कंगनाने हृतिकसोबत अफेअर असल्याचे मान्य करुन बॉलिवूडला मोठा धक्का दिला होता.

Kangana Ranaut कंगना रणौत

कंगना पुन्हा एकदा तिच्या रिलेशनशिप आणि अफेअर्सबद्दल ‘रायझिंग इंडिया समिट’मध्ये खुलेपणाने बोलली. कंगना यावेळी म्हणाली की, ‘माझा प्रियकर मला विचारायचा की, तुला माझ्या आयुष्याबद्दल एवढं कसं माहित? हा काही जादूटोन तर नाही ना? त्याच्या या प्रश्नाचे उत्तर देताना मी म्हणाले की, माझं तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम होतं. ठीक आहे, मी दुसऱ्या कोणाला तरी शोधेन. प्रत्येक ब्रेकअपनंतर मला हे जाणवत गेलं की माझी प्रेम करण्याची क्षमता संपत चालली आहे. माझ्यासाठी प्रेम म्हणजे फक्त शारीरिक संबंध नसून ती एक अध्यात्मिक गोष्ट आहे. प्रेम ही फार सुंदर भावना आहे. प्रेमामुळे ती व्यक्ती तुमच्या आजूबाजूला नसली तरी तुमच्या शरीरातील प्रत्येक अवयव आणि प्रत्येक पेशी या आनंदी असतात… ‘

kangana कंगना रणौत

कंगनाने सांगितले की, ‘आयुष्यात तिच्या पदरी नेहमी निराशाच पडली. लोकांनी तिला नेहमीच नाकारले. माझी बहिणही नेहमी मला बोलते की, तुला असं ‘कॅरेक्टर’ कुठून मिळालं. १६ वर्षापासून ते ३१ व्या वर्षापर्यंत माझ्या आयुष्यात असं एकही रिलेशनशिप नव्हतं की ज्यांना मी सोडलं. प्रत्येकाने मला सोडलं. मी जर त्यांची नावं सांगितली तर तुम्हीही आश्चर्यचकीत होऊन म्हणाल की हा माणुसही असा आहे… काही काळानंतर ते परत माझ्या आयुष्यात आलेही. मात्र मी त्यांना माझ्या आयुष्यात दुसऱ्यांदा स्थान दिलेन नाही. मला नेहमीच पुढे जायचं होतं.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2018 3:57 pm

Web Title: kangana ranaut once again revealed about her breakups love life potential and relationships
Next Stories
1 BLOG : चित्रपट क्षेत्रातील कोंबडी पुराण
2 PHOTOS : तरुणींच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या ‘या’ अभिनेत्याचा साखरपुडा
3 आइस्क्रिम भरवत किंग खान कतरिना म्हणाला, ‘आय लव्ह यू’
Just Now!
X