‘गांधी ग्लोबल गोईंग’ Gandhi Going Global परिषदेत कंगना भारताचं प्रतिनिधित्त्व करणार आहे. पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय पातळीवर कंगना गांधीवादावर भाषण देणार आहे. राष्ट्रपीता महात्मा गांधी यांचे विचार ती जगापुढे मांडणार आहे. विशेष म्हणजे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्षांची पत्नी मिशेल ओबामा आणि टीव्ही होस्ट ओप्रा विन्फ्रेसोबत ती महात्मा गांधींच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करणार आहे.

वाचा : शूट रद्द केल्यानंतर कपिल का म्हणतोय ‘जी नहीं करता’?

अमेरिकेत ही परिषद पार पडणार आहे. गांधीवादाचा प्रसार करणं हे या परिषदेचं मुख्य उद्देश असणार आहे. १८ आणि १९ ऑगस्टला ही परिषद पार पडणार आहे. याव्यतिरिक्त या परिषदेत अनेक प्रभावी विचारवंतांचे विचार श्रोत्यांना ऐकायला मिळणार आहे. शैक्षणिक उपक्रम, प्रेरणादायी संवाद आणि विभिन्न संस्कृतीचा प्रचार यासारखे वेगवेगळे उपक्रमही राबवण्यात येणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेसाठी ५०० स्वयंसेवी संस्था ४०० विद्यापीठ, १०० शाळांचा समावेश असणार आहे. एकूण २५,००० हजांराहून अधिक श्रोते या परिषदेत असतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

वाचा : वर्षाअखेर दीपिका-रणवीर अडकणार विवाहबंधनात?

या कार्यक्रमात देशाचं प्रतिनिधित्त्व करण्याची संधी मिळाल्यानं कंगनाही खूश आहे. या परिषदेत ओप्रा विन्फ्रे असल्यानं कंगनाच्या आनंदाला पारावर उरला नाही.’ मी कोणाचंही अनुकरण करत नाही पण, ओप्रा विन्फ्रेंच्या विचारानं मी खूपच प्रभावित आहे. त्यांच्यासोबत मला व्यासपीठावर बोलण्याची संधी मिळाली आहे ही माझ्यासाठी खूपच अभिमानाची गोष्ट आहे’ असंही कंगना म्हणाली.