मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योगपती राज कुंद्राला अश्लील चित्रपटांची निर्मिती करुन मोबाईल अॅपवर प्रदर्शित केल्याप्रकरणी अटक केली आहे. सोमवारी पोलिसांनी ही कारवाई केली. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी या प्रकरणाची माहिती दिली. आता या प्रकरणार पूनम पांडे, गहना वशिष्ठ यांच्या पाठोपाठ अभिनेत्री कंगना रणौतने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला एक पोस्ट शेअर केली आहे. ‘याच कारणामुळे मी फिल्म इंडस्ट्रीला गटार बोलते. प्रत्येक चमकणारी वस्तू सोनं नसते. मी माझा आगामी प्रोजेक्ट टीकू वेड्स शेरुच्या माध्यमातून बॉलिवूडचा खरा चेहरा प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे’ या आशयाची स्टोरी पोस्ट करत कंगनाने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

Twinkle Khanna reacts on performing in Dawood Ibrahim party
ट्विंकल खन्नाने अंडरवर्ल्ड डॉनच्या पार्टीत केला होता डान्स? प्रतिक्रिया देत म्हणाली, “दाऊदने…”
Salman Khan firing case Facebook account named Anmol Bishnoi was opened on same day of shooting
अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरण : गोळीबाराच्या दिवशीच अनमोल बिष्णोई नावाचे फेसबुक खाते उघडले
Zomato account suspension leaves delivery agent in tears on eve of sister’s wedding
बहिणीच्या लग्नाआधीच बंद झालं डिलिव्हरी बॉयचं खातं; ढसा ढसा रडणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ पाहून झोमटोने दिले उत्तर
youth was kidnapped
खळबळजनक..! मृतदेहाची इन्स्टाला स्टोरी (स्टेटस) ठेवली; ‘त्या’ तरुणाची अपहरण करून केली हत्या

आणखी वाचा : अश्लील व्हिडीओ प्रकरणी अटक झालेल्या राज कुंद्राचा थाट; आलिशान घर पाहिलेत का?

raj kundra porn case, raj kundra case, Raj Kundra, kangana ranaut reacts on raj kundra case, Kangana Ranaut news, Kangana Ranaut,

राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणी सोमवारी रात्री अटक झाली. फेब्रुवारी महिन्यात मढ परिसरातल्या एका बंगल्यावर टाकलेल्या छाप्यामध्ये अश्लील चित्रपट निर्मिती सुरू असल्याचे मुंबई पोलिसांच्या लक्षात आले होते. त्याप्रकरणी सुरू असलेल्या तपासाचा भाग म्हणून सोमवारी राज कुंद्राला अटक करण्यात आली. आज राज कुंद्रा आणि इतर एक आरोपी रियान थार्प या दोघांना न्यायालयात हजर केले असता त्या दोघांची २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. यापैकी राज कुंद्राला सोमवारी रात्री तर थार्पला आज सकाळी अटक करण्यात आली आहे. आत्तापर्यंत या प्रकरणात १२ जणांना अटक करण्यात आली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून मुंबई पोलीस मढ परिसरातील त्या बंगल्यातल्या पॉर्न फिल्म प्रकरणाविषयी तपास करत आहेत. फेब्रुवारी महिन्यात पोलिसांनी छापा टाकून हा प्रकार उधळून लावला होता. यावेळी एका मॉडेलची सुटका करण्यात आली होती. ही मॉडेल मुंबईत बॉलिवूडमध्ये अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी आली असताना पॉर्न फिल्म रॅकेटमध्ये अडकल्याची माहिती नंतर समोर आली.