28 October 2020

News Flash

“पप्पू सेनेला माझ्याशिवाय करमत नाही का?”; कंगना रणौत एफआयआरवर संतापली

कंगनाविरोधात एफआयआर दाखल करा; कोर्टाचा मुंबई पोलिसांना आदेश

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतविरोधात एफआयआर दाखल करण्याचा आदेश देण्यात आला आहे. कंगना आणि तिची बहिण रंगोली सोशल मीडियाद्वारे धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. त्यामुळे या प्रकरणी वांद्रे कोर्टाने मुंबई पोलिसांना कंगनाविरोधात एफआयआर दाखल करण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान या एफआयआरवर कंगनाने प्रतिक्रिया दिली. “पप्पू सेनेला माझ्याशिवाय करमत नाही का?” असा उपरोधिक टोला तिने लगावला आहे.

अवश्य पाहा – एकाच वेळी ‘ती’ दोघांना करत होती डेट; ‘बिग बॉस’मध्ये झाला डबल डेटिंगचा भांडाफोड

“कोण कोण नवरात्रीमध्ये उपवास करणार आहे? आज नवरात्रीच्या निमित्ताने काढलेले हे फोटो पाहा. मी देखील उपवास ठेवणार आहे. माझ्यावर आणखी एक एफआयआर दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रात पप्पू सेनेला माझ्याशिवाय काहीच दिसत नाही. माझी जास्त आठवण काढू नका. मी लवकरच येतेय.” अशा आशयाचं ट्विट करुन कंगनाने प्रतिक्रिया दिली. या ट्विटच्या माध्यमातून तिने पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – माधुरीला वाचवण्यासाठी आमिताभ-गोविंदा यांनी गुंडांसोबत केली होती फाईट; पाहा व्हिडीओ…

वांद्रे कोर्टात कंगनाविरोधात दोन व्यक्तींनी याचिका दाखल केली होती. याचिकेत आरोप करण्यात आला आहे की, कंगना बॉलिवूडमधील हिंदू आणि मुस्लीम कलाकारांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. याशिवाय ती हिंदू-मुस्लीम समुदायात धार्मिक तेढही निर्माण करत आहे. कंगना वारंवार आक्षेपार्ह ट्विट करत असून यामुळे केवळ धार्मिक भावनाच नाही तर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याचिकाकर्त्यांनी कोर्टासमोर पुरावे म्हणून कंगनाचे ट्विट्स आणि व्हिडीओ सादर केले. त्यानंतर कोर्टाने कलम १५६ (३) अंतर्गत एफआयआर दाखल करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2020 5:46 pm

Web Title: kangana ranaut reply over bandra court orders to register fir mppg 94
Next Stories
1 नवरात्रीनिमित्त रुपाली भोसलेचा दुर्गावतार, पाहा फोटो
2 मुसळधार पाऊस अन् चित्रपटाचं चित्रीकरण; ‘सरसेनापती हंबीरराव’चं शुटींग पूर्ण
3 “डिप्रेशनवरुन खिल्ली उडवणं थांबवा, अन्यथा…”; इराने दिला ट्रोलर्सला इशारा
Just Now!
X