News Flash

“इरफान सरांनी माझ्यासोबत काम करण्यास नकार दिला होता”, कंगनाचा खुलासा

जाणून घ्या काय म्हणाली कंगना...

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगना आपलं मत व्यक्त करत असते. सोशल मीडियावरील पोस्टमुळे अनेकदा ती वादातही अडकली आहे. दरम्यान, कंगनाची आता एक जूनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या मुलाखतीत कंगनाने दिवंगत अभिनेता इरफान खानला तिच्यासोबत काम करण्याबद्दल काय वाटले ते सांगितले आहे.

‘इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘तनु वेड्स मनु’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कंगना आणि इरफान या दोघांमध्ये एकत्र काम करण्यावर चर्चा झाली या बद्दल कंगनाने सांगितले आहे. “मी त्यांना सांगितले की आपण चित्रपटाला सुरुवात केली पाहिजे. तर इरफान म्हणाले, हो पण ‘एक म्यान में दो तलवार कैसी रहेगी’, असे कंगना म्हणाली.”

ती पुढे म्हणाली, “मला वाटलं की ही स्तुती आहे. इरफान सरांसारख्या अभिनेत्याने माझ्याबरोबर काम केलेले मला आवडेल. कोणीतरी जो एक चांगली स्पर्धा देईल. माझ्यासाठी ही एक मोठी गोष्ट आहे की ते असा विचार करतात की मी त्यांच्यासाठी एक स्पर्धा आहे. ही स्तुती आहे. मला याचे खूप चांगले वाटते.”

अभिनेत्यांना तुझ्यासोबत एका चित्रपटात काम करायला भीती वाटते का? असा प्रश्न कंगनाला विचारता, “कंगना इरफान खानबद्दल बोलली, अभिनेते मला असे म्हणतात. ते माझ्या तोंडावर सांगतात की आम्हाला तुझ्यासोबत काम करायची भीती वाटते. त्यांना असं वाटतं की मी एखाद्या चित्रपटाला होकार दिला तर माझी भूमिका अधिक रंगवून छान लिहिली जाईल.”

दरम्यान, कंगना लवकरच ‘थलायवी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट जयललिता यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. यानंतर कंगना ‘तेजस’ आणि ‘धाकड’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2021 11:26 am

Web Title: kangana ranaut revealed that irrfan khan refused to work with her dcp 98
Next Stories
1 हटके फोटो शेअर करत अमिताभ यांनी दिला मास्क घालण्याचा सल्ला
2 ‘म्हणून मुलींवर बलात्कार होतात’, कपड्यांवरुन ट्रोल करणाऱ्याला अभिनेत्रीने दिले उत्तर म्हणाली…
3 युजरच्या ‘त्या’ कमेंटवर तापसी पन्नू भडकली; “मूर्खपणा कमी करा”
Just Now!
X