News Flash

जयललिता यांची भूमिका साकारण्यासाठी कंगनाने घेतल्या हार्मोन्सच्या गोळ्या

खुद्द कंगनाने केला याबाबतचा खुलासा

अभिनेत्री कंगना रणौत

बॉलिवूडची ‘क्वीन’ अर्थात अभिनेत्री कंगना रणौतच्या आगामी ‘थलाइवी’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात कंगना तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकारत आहे. पोस्टरवरील कंगनाचा लूक थक्क करणारा होता. जयललिता यांच्यासारखं दिसण्यासाठी कंगनाने खूप मेहनत घेतली आहे.

या भूमिकेसाठी कंगनाने कशाप्रकारे तयारी केली याबद्दल तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सविस्तरपणे सांगितले. जयललिता यांच्यासारखं दिसण्यासाठी कंगनाने सहा किलो वजन वाढवलं आहे. कंगना उंच व बारीक असल्याने या भूमिकेसाठी वजन वाढवणं गरजेचं होतं. यासाठी पौष्टिक खाण्यापिण्यासोबतच हार्मोन्सच्या गोळ्या घेतल्याचं कंगनाने सांगितलं. चेहऱ्यासाठी तिने जेसन कोलिन्स या प्रोस्थेटिक मेकअपमनची मदत घेतली.

आणखी वाचा : ..म्हणून तापसीने नाकारली ‘इन्फोसिस’मधल्या नोकरीची संधी  

याविषयी कंगनाने ‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, “जयललिता यांच्यासारखं दिसण्यासाठी माझ्या शरीररचनेत काही बदल करावे लागले. कारण खऱ्या आयुष्यातही जयललिता यांच्यात बदल झाले होते. नृत्यांगना असल्याने जयललिता यांची शरीरयष्टी कमालीचे सुंदर होती. मात्र एका दुर्घटनेनंतर त्यांना बरेच स्टेरॉइड्स घ्यावे लागले. ज्यामुळे त्यांचे वजन खूप वाढले.”

‘थलाइवी’ हा बायोपिक तामिळ, तेलुगू आणि हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी कंगनाने २० कोटी रुपये मानधन स्वीकारल्याचं समजतंय. २६ जून २०२० रोजी हा बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2019 1:37 pm

Web Title: kangana ranaut reveals she took dose of hormone pills to gain weight for jayalalithaa biopic ssv 92
Next Stories
1 “ही जाणीवपूर्वक बदनामी”,अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या वकिलाचा खुलासा
2 महागड्या गाड्यांचा शौकीन जॉन; पाहा व्हिडीओ
3 ..म्हणून तापसीने नाकारली ‘इन्फोसिस’मधल्या नोकरीची संधी
Just Now!
X