News Flash

पहलाज निहलानी यांनी अंतर्वस्त्राशिवाय फोटोशूट करायला सांगितले होते- कंगना

'मुंबईत आल्यानंतर सुरुवातीच्या काळात मला अनेक वाईट अनुभवांना तोंड द्यावं लागलं होतं.'

पहलाज निहलानी, कंगना रणौत

बॉलिवूडमध्ये गॉडफादर असल्याशिवाय सहजासहजी पदार्पण करता येत नाही असं म्हटलं जातं. इंडस्ट्रीत नाव कमावण्यासाठी कलाकारांना बरंच स्ट्रगल करावं लागतं. बॉलिवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना रणौतनेसुद्धा सुरुवातीच्या काळात स्ट्रगल केलं. कंगनाला अभिनयाची पार्श्वभूमी नव्हती. शिवाय ती एका छोट्या गावातील मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी होती. बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना तिलाही बऱ्याच प्रसंगांना सामोरं जावं लागलं. बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या कंगनाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला. निर्माते-दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या एका चित्रपटाविषयीचा तिने प्रसंग सांगितला.

‘मुंबईत आल्यानंतर सुरुवातीच्या काळात मला अनेक वाईट अनुभवांना तोंड द्यावं लागलं होतं. पहलाज निहलानी यांनी मला त्यांच्या एका चित्रपटाची ऑफर दिली होती. ‘आय लव्ह यू बॉय’ असं त्या चित्रपटाचं नाव असून त्यासाठी फोटोशूट होणार होतं. फोटोशूटसाठी मला त्यांनी रोब (पारदर्शक गाऊन) घालायला दिला होता. अंतर्वस्त परिधान न करता फक्त रोबवर त्यांनी मला फोटोशूट करायला सांगितलं होतं. या चित्रपटात मी एका मुलीची भूमिका साकारणार होती, जिच्या मनात तिच्या बॉसविषयी लैंगिक भावना आहेत. ती एक सॉफ्ट पॉर्न भूमिका होती असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हे सगळं ऐकूनच मी हे काम करू शकत नाही असं सांगितलं आणि तिथून अक्षरश: पळ काढला. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण त्यानंतर मी काही दिवस सगळ्यांपासून लांब राहत होती. मी माझा नंबरदेखील बदलला होता,’ असं तिने सांगितलं.

फोटोशूटच्या या प्रसंगानंतर काही काळाने मला गँगस्टर या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आणि माझ्या करिअरला दिशा मिळाली असं ती सांगते. कंगनाने तिच्या अभिनय कौशल्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2019 6:00 pm

Web Title: kangana ranaut reveals she was asked to pose in robe and no undergarments for a pahlaj nihalani film
Next Stories
1 …म्हणून तानाजी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली
2 ही असतील ‘सेक्रेड गेम्स २’च्या एपिसोड्सची नावं?
3 भन्साळींनी ‘पद्मावत’साठी माझ्या नावाचा विचार केला होता, कंगनाचा दावा
Just Now!
X