अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीदरम्यान ‘बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण’ समोर आलं आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाद्वारे या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. या चौकशीदरम्यान सारा अली खान, रकुल प्रित सिंह, सिमोन खंबाटा, अर्जुन रामपाल, करण जोहर, भारती सिंह यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांची नावं समोर आली. परिणामी बॉलिवूडवर सध्या जोरदार टीका होत आहे. मात्र या ड्रग्ज प्रकरणाच्या वादात आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी देखील उडी घेतली आहे. इतर कलाकांची चौकशी केली जातेय मग कंगनाची का नाही? असा सवाल त्यांनी एनसीबीला केला आहे.

अवश्य पाहा – “शीख, मुस्लिम, हिंदू प्रत्येक जण माझ्या विरोधात”; कंगनाने व्यक्त केलं दु:ख

“एनसीबी कंगना रणौतला चौकशीसाठी का बोलवत नाही? तिने स्वत: एका व्हिडीओद्वारे ड्रग्ज सेवन केल्याचं मान्य केलं आहे. एनसीबी अशा मुद्द्यांवर चौकशी करतेय ज्यांचा सुशांत प्रकरणाशी काडीचाही संबंध नाही.” अशा आशयाचं ट्विट करुन सचिन सावंत यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. यानंतर त्यांनी आणखी एक ट्विट केलं ज्यामध्ये त्यांनी करण जोहरच्या पार्टीचा उल्लेख केला. “जर करणच्या पार्टीत ड्रग्ज घेतल्याची शंका होती तर भाजपाने तेव्हाच त्याची चौकशी का केली नाही? तो व्हिडीओ तर २०१९ चा आहे. त्यावेळी महाराष्ट्रात भाजपाकडे सत्ता होती.” असा टोला देखील त्यांनी लगावला. त्यांची ही दोन्ही ट्विट्स सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.

अवश्य पाहा – सोज्वळ सुनेचा बिकिनी अवतार; हॉट फोटोशूटमुळे चाहते अवाक

अवश्य पाहा – अरे बापरे… ही अभिनेत्री एका फोटोशूटसाठी घेते २०० कोटी

हे प्रकरण काय आहे?

करण जोहरने गेल्या वर्षी आपल्या घरात एका पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीमध्ये रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, विकी कौशल, मलायका अरोरा यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांनी हजेरी लावली होती. या पार्टीमध्ये अंमली पदार्थांचं सेवन करण्यात आलं होतं असा आरोप माजी आमदार मनजिंदर सिंह सिरसा यांनी केला होता. शिवाय त्यांनी करण विरोधात अंमली पदार्थ विरोधी पथकाकडे तक्रार देखील केली होती. तसेच गेल्या काही काळात ड्रग्ज घेणाऱ्या बॉलिवूड कलाकारांची नावं समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर एनसीबीने करण जोहर विरोधात समन्स जारी करुन त्याला चौकशीसाठी बोलावलं होतं. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार या चौकशीदरम्यान “मी ड्रग्ज घेत नाही, अन् माझ्या कुठल्याही पार्टीमध्ये आजवर ड्रग्जचं सेवन केलं गेलेलं नाही.” असं स्पष्टीकरण करण जोहरनं दिलं.