News Flash

मी टॉम क्रुजपेक्षा चांगले अ‍ॅक्शन स्टंट करु शकते, कंगनाचे ट्विट चर्चेत

या ट्विटमुळे कंगना प्रचंड ट्रोल होताना दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगना आपलं मत व्यक्त करत असते. सोशल मीडियावरील पोस्टमुळे अनेकदा ती वादातही अडकली आहे. दरम्यान कंगनाने आता एक नवं वक्तव्य केलं असून त्यात अ‍ॅक्शन स्टंट करण्यात कंगनाने स्वत:ला हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रुजपेक्षा चांगली असल्याचे म्हटले आहे.

कंगनाने एक ट्विट रिट्विट केले आहे. या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, मनिकर्णिका चित्रपटाचे अ‍ॅक्शन दिग्दर्शक निक पॉवेल म्हणाले की मनिकर्णिका या चित्रपटात कंगनाने टॉम क्रुज पेक्षा चांगले स्टंट केले आहेत. हे ट्विट रिट्विट करत कंगना म्हणाली, “सुप्रसिद्ध अ‍ॅक्शन दिग्दर्शक ज्यांनी हॉलिवूडच्या अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे त्यांच म्हणणे आहे की मी टॉम क्रुजपेक्षा चांगले अ‍ॅक्शन स्टंट करू शकते.” या ट्विटमुळे कंगना प्रचंड ट्रोल होताना दिसत आहे.

या आधी केलेल्या दोन ट्विटमुळे कंगना ट्रोल झाली होती. एका ट्विटमध्ये कंगनाने संपूर्ण जगात आपल्यासारखी प्रतिभावान अभिनेत्री कोणीच नाही असे म्हटले होते. तर दुसऱ्या ट्विटमध्ये कंगनाने स्वत:ची तुलना ही तिनवेळा ऑस्कर पुरस्कार जिंकणाऱ्या अभिनेत्री मेरील स्ट्रिप आणि हॉलिवूड अभिनेत्री गॅल गॅडोटशी केली होती.

आणखी वाचा- माझ्या इतकी प्रतिभावान अभिनेत्री संपूर्ण पृथ्वीवर शोधून दाखवा, सापडली तर…; कंगनाचं ट्विट

कंगना लवकरच ‘थलाइवी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकारत आहे. याशिवाय तिचा ‘तेजस’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या कंगना आता धाकड या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2021 11:20 am

Web Title: kangana ranaut says im better than hollywood actor tom cruise dcp 98 avb 95
Next Stories
1 अभिनेत्री अनिता हसनंदानीच्या घरी चिमुकल्याचे आगमन
2 लॉकडाउनमध्ये पॉर्न फिल्मसची मागणी वाढली म्हणून…पॉर्न रॅकेट प्रकरणात धक्कादायक खुलासा
3 नसीरुद्दीन शाह यांचा शेतकऱ्यांना पाठिंबा? जाणून घ्या ‘त्या’ व्हायरल ट्विटचं सत्य
Just Now!
X