News Flash

“…तर मी ट्विटर कायमचं सोडेन”; कंगना रणौतनं दिलं आव्हान

"...तर मी ट्विटर कायमचं सोडेन"; कंगना रणौतने केली नवी घोषणा

अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सध्या प्रचंड चर्चेत आहे. महाराष्ट्र सरकार आणि बॉलिवूड सिनेसृष्टीवर ती सातत्याने आरोप करत आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना तर तिने सॉफ्ट पॉर्नस्टार असं म्हटलं होतं. मात्र या संपूर्ण वादावर आता कंगना रणौत पडदा टाकण्यासाठी तयार आहे. ही लढाई कंगनाने सुरु केली, असं कोणी सिद्ध करुन दाखवलं तर ती ट्विटर कायमचं सोडून देईल, असं आव्हान तिने आपल्या विरोधकांना दिलं आहे.

अवश्य पाहा – “मुलांसाठी थाळ्या सजवतात अन् आम्हाला फेकलेले तुकडे देतात”

“लोक मला भांडखोर प्रवृत्तीची व्यक्ती समजतात, परंतु हे असत्य आहे. आजवर कधीही मी स्वत:हून लढाई सुरु केलेली नाही. समोरुन आरोप झाल्यानंतरच मी प्रत्युत्तर दिलं आहे. या लढाईची सुरुवात माझ्यामुळे झाली हे जर कोणी सिद्ध करुन दाखवलं तर मी ट्विटर कायमचं सोडून देईन. ही लढाई कायमची संपवेन. भगवान श्री कृष्ण यांनी सांगितलय जर कोणी लढाईसाठी आव्हान देत असेल तर त्या आव्हानाला नकार देऊ नका.” अशा आशयाचं ट्विट कंगना रणौतने केलं आहे. कंगनाने घेतलेली ही नवी भूमिका सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अवश्य पाहा – “पॉर्नस्टार शब्दाचा विरोध करणारे सनी लिओनीला आदर्श कसे मानतात?”

यापूर्वी काय म्हणाली होती कंगना?

‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत कंगना रणौतने उर्मिला मातोंडकर यांना सॉफ्ट पॉर्न करणारी अभिनेत्री असं म्हटलं होतं. “उर्मिला मातोंडकर या सॉफ्ट पॉर्न स्टार आहेत. त्या त्यांच्या अभिनयासाठी नक्कीच ओळखल्या जात नाहीत. कशामुळे ओळखल्या जातात मग? सॉफ्ट पॉर्नसाठीच ना? जर त्यांना तिकिट मिळू शकतं तर मला का नाही मिळणार? कोणालाही तिकिट मिळू शकतं.” अशी टीका तिने केली होती. या टीकेमुळे बॉलिवूड विरुद्ध कंगना असा सुरु असलेला वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 2:18 pm

Web Title: kangana ranaut says she has ready to quit twitter mppg 94
Next Stories
1 ‘प्रेम पॉइजन पंगा’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप
2 प्रसिद्ध अभिनेत्याचा बॅडमिंटन खेळताना मृत्यू
3 ‘बिग बॉस १४’मध्ये सहभागी होणार करण पटेल?
Just Now!
X