06 August 2020

News Flash

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर कंगना संतापली, म्हणाली…

एका व्हिडिओवर कमेंट करताना कंगनाने व्यक्त केलं मत

स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे निर्माण झालेला वाद शांत होण्याची चिन्ह दिसत नाहीत. जोशुआने यासंदर्भात माफी मागितल्यानंतर तिला थेट बलात्काराची धमकी देणारा व्हिडिओ शुभम मिश्रा या तरुणाने पोस्ट केला. त्यानंतर अभिनेत्री स्वरा भास्करने या तरुणाला अटक करण्याची मागणी केली. वडोदरा पोलिसांनी या तरुणाला अटक केली. आता या प्रकरणावरुन ट्विटवरही जोरदार चर्चा सुरु आहे. महापुरुषांचा अपमान करणाऱ्या कॉमेडियन्सवर कारवाई करण्यात यावी असं अनेकांचं म्हणणं असून यामध्ये आता बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतचीही भर पडली आहे. कंगनानेही अशाच प्रकारची मागणी केली आहे.

नक्की वाचा >> अग्रिमा जोशुआला बलात्काराची धमकी देणाऱ्याला अटक

कंगना रणौतचे म्हणणे ऑनलाइन माध्यमावर मांडणाऱ्या टीम कंगना रणौत या ट्विटर हॅण्डलवरुन एका कॉमेडियनने या सर्व प्रकरणावर पोस्ट केलेल्या उपहासात्मक व्हिडिओवर कमेंट करण्यात आली आहे. या उपहासात्मक व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा संदर्भ देत सध्याच्या कॉमेडियन्सवर भाष्य करण्यात आलं आहे. यामध्ये कंगणाने “ज्यांना दोन पैशाचीही किंमत नाहीय, ज्यांना कोणी विचारत नाही असे लोकं शहीदांची मस्करी करतात. हे योग्य नाही. कोणीही शहीदांची मस्करी करु नये. आपले राष्ट्रीय हिरो आणि थोर व्यक्तींची मस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कठोर कायदे हवेत,” असं मत व्यक्त केलं आहे.

कंगनाने लगावलेला हा टोला अप्रत्यक्षपणे अभिनेत्री स्वरा भास्करसाठी असल्याचे बोलले जात आहे. ज्या व्हिडिओवर कंगनाने कमेंट केली आहे त्यामध्ये स्वरा भास्करला माझा विनोद आवडला होता असं म्हटलं आहे. स्वरा भास्करने पुढाकार घेतल्यामुळेच शुभम मिश्राचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याच्यावर कारवाई झाल्याने नेटकऱ्यांनी स्वराचेही अभिनंदन केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 8:17 am

Web Title: kangana ranaut says there should be strict laws against making fun national heroes scsg 91
Next Stories
1 लॉकडाउन काळात सोनम कपूर पोहचली लंडनमध्ये
2 विमानात सोशल डिस्टंसिंगचे नियम धाब्यावर; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
3 बिग बॉस १४मध्ये होणार बदल, स्पर्धकांना मिळणार फोन वापरायला?
Just Now!
X