28 February 2021

News Flash

Video : “जो फिट आहे तो हिट आहे”, कंगनाने शेअर केला व्हिडीओ

कंगनाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. कंगना सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. आता कंगनाने शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे ती चर्चेत आली आहे.

कंगनाने ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. कंगनाने तिच्या आगामी चित्रपट धाकडच्या तयारीचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कंगना वर्कआऊट करताना दिसत आहे. “सकाळचा व्यायाम, आयुष्यात एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. जो फिट आहे तो हिट आहे. आपल्या आरोग्याकडे कधीच दुर्लक्ष करू नका. चांगल्या माणसांच्या सहवासात राहण्याचा नेहमी प्रयत्न करा. जर आपण अशा लोकांना समोरा समोर भेटू शकत नसाल तर त्यांची पुस्तक वाचा.” अशा आशयाचं कॅप्शन कंगनाने व्हिडीओला दिलं आहे.

आणखी वाचा : गुरु रंधावाने केला साखरपुडा? फोटोतील ‘मिस्ट्री गर्ल’ आहे तरी कोण?

कंगना लवकरच ‘धाकड’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ‘थलाइवी’ या चित्रपटात ती तमिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकारत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2021 7:41 pm

Web Title: kangana ranaut share a new video of workout went viral dcp 98
Next Stories
1 ‘गंगूबाई काठियावाडी’नंतर आलिया पुन्हा करणार संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम?
2 ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मधून नायरा घेणार एक्झिट?
3 किचन वर्सेस लिव्हींग रूम; नेहाने शेअर केली घरातील रिअ‍ॅलिटी
Just Now!
X