News Flash

इंदिरा गांधी यांच्या भूमिकेसाठी कंगना रणौत सज्ज; ‘अशी’ सुरू आहे लूकसाठी तयारी

कंगना रणौतने याआधीच हा सिनेमा इंदिरा गांधी यांची बायोपिक नसल्याचं स्पष्ट केलंय

(Photo-Instagram@kanganaranaut)

अभिनेत्री कंगना रणौत सध्या अनेक प्रोजेक्टवर काम करत आहे. येत्या काळात ‘धाकड’ तसचं ‘तेजस’ सह अनेक सिनेमांमध्ये कंगना वेगवेगळ्या भूमिकांमध्ये झळकणार आहे. प्रत्येक भूमिकेसाठी कंगना कायमच मोठी मेहनत घेताना दिसते. यातच आता कंगना लवकरच इंदिरा गांधी यांच्यावर आधारित एका पॉलिटिकल ड्रामात झळकणार अशा चर्चा होत्या. या सिनेमाबद्दल आता कंगनाने एक अपडेट दिलंय.

कंगना रणौतने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. यात कंगनाने इंदिरा गांधी यांच्या भूमिकेसाठी तयारी सुरू झाल्याचं स्पष्ट केलंय. प्रोडक्शन हाऊसच्या कार्यालयात इंदिरा गांधी यांच्या लूकसाठी कशाप्रकारे बॉडी स्कॅनिंग केलं जातं हे तिने या फोटोच्या माध्यमातून चाहत्यांना सांगितलं आहे.

त्यामुळे येत्या काळात आता थलायवीनंतर कंगना भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत पुन्हा एकदा एका राजकारणी व्यक्तीची भूमिका साकारण्यासाठी सज्ज झालीय. कॅप्शनमध्ये कंगना म्हणाली, “प्रत्येक भूमिका म्हणजे नव्या प्रवासाची सुंदर सुरूवात असते. आज आम्ही #Emergency #Indira च्या प्रवासाला बॉडी आणि फेस स्कॅनिंगने सुरुवात केली आहे ज्यामुळे अगदी योग्य लूक साधता येईल.”असं ती म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

हे देखील वाचा: करीना कपूरचा पत्ता कट; सीतेच्या भूमिकेसाठी ‘या’ अभिनेत्रीच्या नावाची चर्चा

पुढे कंगना म्हणाली, “आम्ही ठरवलेलं ध्येय स्क्रीनवर साकारण्यासाठी अनेक अद्भुत कलाकार एकत्र आले आहेत. हे खूप स्पेशल असेल.” असं म्हणत कंगनाने ती या भूमिकेसाठी खूपच उत्सुक असल्याचं म्हंटलं आहे.

दरम्यान कंगना रणौतने याआधीच हा सिनेमा इंदिरा गांधी यांची बायोपिक नसल्याचं स्पष्ट केलंय. या सिनेमाचं दिग्दर्शन साई कबीर करणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2021 11:00 am

Web Title: kangana ranaut share look photo for her upcoming role of pm indira gandhi for emergency indira kpw 89
Next Stories
1 केआरकेला झटका, कोर्टाने सलमानवर कमेंट आणि व्हिडीओ करण्यापासून रोखले
2 राज बब्बर आणि स्मिता पाटील यांच्या नात्यावर झाली होती बरीच टीका; राजकुमारकडे केला होता हट्ट
3 चेहऱ्यावर मेकअप असताना अखेरचा श्वास घ्यायचा; कॅन्सरशी लढा देणारे नट्टू काका झाले भावूक
Just Now!
X