बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. शेतकरी आंदोलनावर व्यक्त होणाऱ्या कंगनाने तिचं टीकास्त्र आता आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींवर डागलं आहे. त्यामुळे सध्या ती सातत्याने चर्चेचा विषय ठरत आहे. यामध्येच तिच्या आगामी ‘धाकड’ या चित्रपटातील एक पोस्टर प्रदर्शित झालं आहे. या पोस्टरमध्ये कंगना एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर आली आहे.
कंगनाचा ‘धाकड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे या चित्रपटातील काही भूमिकांवरील पडदा दूर सारण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील अभिनेत्री दिव्या दत्ताचा लूक समोर आला होता. त्यानंतर, आता कंगनाचा लूक समोर आला आहे.
View this post on Instagram
प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये कंगनाचा चित्रपटाच्या नावाप्रमाणेच धाकड लूक असल्याचं दिसून येत आहे. यात कंगनाने हातात बंदूक धरली असून तिच्या पाठीमागे अनेक गाड्या आणि आगीचे लोळ दिसत आहेत. तसंच तिच्या नजरेचा कटाक्ष अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.
“ते तिला अग्नी म्हणतात…एक निर्भयी #Dhaakad”, असं कॅप्शन कंगनाने या फोटोला दिलं आहे.
दरम्यान, ‘धाकड’ हा चित्रपट १ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री कंगना रणौत मुख्य भूमिका साकारत आहे. तर तिच्यासोबत दिव्या दत्ता, अर्जुन रामपाल महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती सोहेल मकलाई करत असून रजनीश घई या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 8, 2021 12:04 pm