21 January 2021

News Flash

कंगनाने शेअर केला ‘मणिकर्णिका’च्या सेटवरील तो फोटो; म्हणाली, ‘हा तर लक्ष्मीबाईंनी…’

कंगनाने दिला जुन्या आठवणींना उजाळा

‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटातून अभिनेत्री कंगना रणौतने झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा जीवनप्रवास उलगडण्याचा प्रयत्न केला. या चित्रपटाच्या निमित्ताने तिने पहिल्यांदाच दिग्दर्शकीय क्षेत्रात यशस्वीरित्या पदार्पण केलं. विशेष म्हणजे हा चित्रपट सुपरहिट ठरला. अलिकडेच कंगनाने डिजिटल डेब्यु केला असून तिने ‘मणिकर्णिका’च्या सेटवरील पहिल्या दिवसाचा अनुभव शेअर केला आहे.

कंगनाने ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्या दोन्ही भुवयांमध्ये जखम झाल्याचं दिसून येत आहे. ही जखम ‘मणिकर्णिका’च्या सेटवर पहिल्याच दिवशी झाल्याचं कंगनाने सांगितलं.

“मणिकर्णिकाच्या चित्रीकरणाचा पहिला दिवस. तलवारबाजीचा एक महिने सराव केला होता. मात्र पहिल्याच सीनमध्ये सहकलाकाराकडून जवळपास १ किलोची तलवार माझ्या डोक्याला लागली. त्यावर लक्ष्मीबाईंनी मला पेशव्यांचा टिळा लावला आहे. त्यामुळे हा कायम माझ्या चेहऱ्यावर चमकत राहिलं,असं मी म्हटलं होतं”, अशी पोस्ट कंगनाने शेअर केली आहे.

दरम्यान, कंगनाने ट्विटरवर पदार्पण केल्यापासून ती सतत अॅक्टीव्ह असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या ती सुशांत सिंह राजपूतला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. तसंच मध्यंतरी तिने करण जोहर, महेश भट्ट यांच्यावर घराणेशाहीचे आरोप कले होते.त्यामुळे सध्या ती विविध कारणांमुळे चर्चेत येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2020 9:52 am

Web Title: kangana ranaut shares a picture of her head injury on the sets of manikarnika ssj 93
Next Stories
1 मृत्यूनंतरही दिशा सालियनचा फोन सुरु होता? ; नेमकं काय आहे प्रकरण
2 सुशांत सिंह मृत्यूप्रकरण : शिबानी दांडेकरने उलगडलं ‘त्या’ मिस्ट्री गर्लचं रहस्य
3 मुंबईतील रिसॉर्टवर ‘सीबीआय’चा तपास
Just Now!
X