News Flash

‘अनुरागने मुलाचे शोषण…’, कंगनाने शेअर केला जुना व्हिडीओ

हा जुना व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

‘अनुरागने मुलाचे शोषण…’, कंगनाने शेअर केला जुना व्हिडीओ

अभिनेत्री पायल घोषने बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपवर गैरवर्तनाचा आरोप केला. त्यानंतर काही अभिनेत्रींनी अनुरागला पाठिंबा दिला तर काहींनी त्याला चांगलेच सुनावले. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत पायल घोषच्या समर्थनार्थ पुढे आली असून अनुराग कश्यपच्या अटकेची मागणी तिने केली होती. आता कंगनाने अनुरागचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे.

कंगनाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अनुराग लहानपणी एका मुलाचे शोषण केले असल्याचे बोलताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून अनेकजण त्यावर कमेंट करत आहेत.

आणखी वाचा- अनुराग कश्यपविरोधात वर्सोवा पोलीस स्थानकात एफआयआर दाखल

हा व्हिडीओ शेअर करत कंगनाने ‘मी सुशांत सिंह राजपूतला मारणाऱ्या आणि मला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सुसाईट गँग विषयी बोलले होते. पण हे लोकं इतरांसोबत असे का करतात? अनुराग काय बोलत आहे ऐका, त्याने एका मुलाचे शोषण केले आहे. हे असे लोकं आहेत जे इतरांना दु:ख देतात’ या आशयाचे ट्विट कंगनाने केले होते.

आणखी वाचा- ‘जर अनुराग दोषी असेल तर…’, तापसी पन्नूचे मोठे विधान

कंगनाने शेअर केलेला या दोन मिनिटांच्या व्हिडीओमध्ये अनुराग एका मुलाखतीमध्ये बोलताना दिसत आहे. मी लहान असताना एका मुलाला बाजूला घेऊन गेलो आणि त्याला मारले. नंतर त्याच मुलाला मी मिठी मारली आणि त्याच्या समोर रडू लागतो. कारण हे सगळं माझ्यासोबत झाले होते असे अनुराग बोलताना दिसत आहे. कंगनाने हा व्हिडीओ शेअर करताच २ लाखपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. तसेच हा व्हिडीओ राजीव सिंह राठोड नावाच्या एका यूजने ट्विट केला होता. या यूजरचा हा व्हिडीओ कंगनाने रिट्वीट केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2020 11:14 am

Web Title: kangana ranaut shares a throwback video of anurag kashyap confessing that he molested a kid avb 95
Next Stories
1 अभिनेत्री छाया कदम ‘मेरे साई’ मालिकेत साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका
2 ‘अशी ही बनवाबनवी’चा रिमेक येणार का?; सचिन पिळगावकर म्हणतात..
3 ओळखलात का चित्रपट? ३२ वर्षांनंतरही लोकप्रियता कायम
Just Now!
X