Advertisement

फादर्स डे निमित्त कंगनाने व्यक्त केल्या वडिलांसाठीच्या भावना; म्हणाली, “स्वखुशीने व्हिलन बनत होते…”

बॉलिवूडची क्वीन कंगना रनौत आतापर्यंत तिच्या वडिलांच्या शिस्तपणा आणि कठोर स्वभावावर अनेकदा बोलताना दिसली. पण आजच्या फादर्स डेच्या निमित्ताने कंगनाने वडिलांसाठी इमोशनल पोस्ट लिहिलीय.

आजच्या फादर्स डे च्या निमित्ताने सर्वच बॉलिवूड सेलिब्रिटींनी आपआपल्या वडिलांसाठी मनात असलेल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या. बॉलिवूडची क्वीन कंगना रनौत आतापर्यंत तिच्या वडिलांच्या शिस्तपणा आणि कठोर स्वभावावर अनेक बोलताना दिसली. पण आजच्या फादर्स डेच्या निमित्ताने कंगनाने वडिलांसाठी प्रेमळ आणि इमोशनल पोस्ट लिहिलीय.

कंगना रनौतने आपल्या वडिलांसोबत एक फोटो शेअर ही इमोशनल पोस्ट लिहिलीय. यात तिने लिहिलंय, “वडिलांनी केलेल्या योगदानाचं श्रेय कधीच मिळत नाही…आमच्या गरजा, शिक्षण, समस्या आणि महत्त्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी आईने माझ्या वडिलांना शक्य ते सर्व करण्यासाठी सांगितलं होतं. त्यांनी आम्हाला लिहायला-वाचायला शिकवलं. त्यांनी आम्हाला डॉक्टरकडे इंजेक्शन घेण्यासाठी नेलं…ज्यावेळी आमची आई आम्हाला एखाद्या गोष्टीसाठी नकार देत असे किंवा ओरडत असे, त्यावेळी आम्ही वडिलांची मदत घेत होतो. कारण आम्ही आईचं कधी ऐकत नव्हतो आणि आमचे वडील स्वखुशीने व्हिलन बनत होते. तुमच्या या निस्वार्थ प्रेमासाठी खूप खूप आभार. हॅपी फादर्स डे.”

कंगना रनौतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तिचा ‘थलाइवा’ हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. तिचा हा चित्रपट तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर आधारित आहे. याशिवाय कंगनाच्या ‘धाकड’ चित्रपटाची शूटिंग सुरू आहे. यात तिचा अॅक्शन अवतार दिसणार असून ती एजंट अवनीची भूमिका साकारणार आहे. ‘तेजस’ चित्रपटात देखील दिसून येणार आहे. या चित्रपटात ती भारतीय वायुसेनामधील फायटर पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे.

23
READ IN APP
X
X