आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते आणि आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेते. नुकताच कंगनाने एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये तिने तिला एक मोठा भाऊ असल्याचे म्हटले आहे.

कंगनाने ट्विटर अकाऊंटवर भाऊ आणि बहिणीसोबतचे थ्रोबॅक फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत रंगोलीच्या जन्माआधी आमच्या मोठ्या भावाचा जन्म झाला होता. पण तो आज आपल्यामध्ये नाही असे कंगनाने म्हटले आहे.

आणखी वाचा: प्रेग्नंसीमध्ये दिया मिर्झानेही अवलंबला करीना-अनुष्काचा मार्ग, व्हिडीओ व्हायरल

“आज सिबलिंग डे आहे का? माझ्या आईला आमच्या आधी एक मुलं होते पण काही कारणास्तव त्याचे निधन झाले. मला असे वाटते की आम्ही तिघं तीन भागांमध्ये विभागलो आहोत. हा हा हा.. अशा अनेक विलक्षण उपमा आहेत. या फोटोंमध्ये मला अजोबा नानाजी ठाकूर यांचा कधी न पाहिलेला फोटो सापडला” या आशयाचे ट्वीट कंगनाने केले आहे.

कंगनाने शेअर केलेल्या फोटोमधील एका फोटोमध्ये ती तिची बहिण रंगोली आणि भाऊ अक्षतसोबत दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये ती आणि रंगोली दिसत आहे. तिसऱ्या फोटोमध्ये कंगनाचे अजोबा आणि पणजोबा दिसत आहेत. सध्या हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.