अभिनेत्री कंगना रणौत व हृतिक रोशन यांच्यातील वाद जगजाहिर आहे. एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात असणारे हे दोघं आरोप-प्रत्यारोपांच्या बऱ्याच फैरी झाल्यानंतर आता संपर्कातसुद्धा नाहीत. हे दोघं आता एकमेकांना दुर्लक्ष करणंच पसंत करतात. मात्र कंगनाची बहिण रंगोली चंडेल ट्विटरच्या माध्यमातून हृतिकवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाही. रंगोलीने ट्विटरवर नुकताच हृतिकसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे आणि या फोटोसोबतच तिने त्याच्याबाबत मोठा खुलासासुद्धा केला आहे.
‘हे पाहा पप्पूजी.. संपूर्ण दिवस मला इम्प्रेस करण्यात घालवायचा, जेणेकरून माझ्या बहिणीच्या नजरेत स्वत: चांगला व्यक्ती दिसावा म्हणून.. आणि आता म्हणतो हम आपके है कौन?’, असं लिहित रंगोलीने हृतिकवर निशाणा साधला आहे. या फोटोमध्ये हृतिक व रंगोली आनंदाने पोझ देताना दिसत आहेत.
Yeh dekho Pappu ji, sara din mujhe impress karne mein laga rehta tha taki meri bahen ki good books mein aa jaye, aur aaj kehta hai hum aapke hain kaun pic.twitter.com/KLj7Gc0YYo
— Rangoli Chandel (@Rangoli_A) March 17, 2020
आणखी वाचा : ‘घाडगे & सून’ फेम भाग्यश्री व भूषण प्रधानमध्ये नेमकं काय शिजतंय?
‘क्रिश ३’ चित्रपटादरम्यान कंगना व हृतिक एकमेकांना डेट करत असल्याच्या बऱ्याच चर्चा होत्या. कंगनामुळेच हृतिकचा सुझानसोबत घटस्फोट झाला अशीदेखील चर्चा होती. मात्र ब्रेकअपनंतर कंगनाने हृतिकवर बरेच आरोप केले. तर हृतिकनेही कंगनावर आपला पाठलाग करण्याचे आणि अश्लील मेसेज पाठवण्याचे आरोप केले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 18, 2020 1:45 pm