25 October 2020

News Flash

‘स्टारकिड्स स्वप्न दाखवतात आणि नंतर…’, सारा- सुशांतच्या नात्याच्या चर्चांवर कंगनाचे वक्तव्य

सध्या कंगनाचे ट्विट चर्चेत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या सडेतोड वक्तव्यासाठी विशेष ओळखली जाते. तिने अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात तिचे मत मांडले. तिने सुशांतने घराणेशाहीला कंटाळून आत्महत्या केल्याचे म्हणत महेश भट्ट, करण जोहर आणि इतर स्टारकिड्सवर निशाणा साधला. आता तिने सोशल मीडियावर सुरु असणाऱ्या सारा आणि सुशांतच्या रिलेशनशीपच्या चर्चांवर वक्तव्य केले आहे.

कंगनाने सुशांत आणि साराच्या रिलेशनशीपची बातमी शेअर करत ट्विट केले आहे. सारा आणि सुशांतच्या अफेअरच्या चर्चा सध्या मीडियामध्ये पाहायला मिळतात. आउटडोर शूटिंगच्या वेळी दोघांनी एकच रुम शेअर केली होती. का हे फॅन्सी नेपोटिजम किड्स संवेदनशील आउटसायर्डसला स्वप्न दाखवतात आणि नंतर त्यांना सर्वांसमोर सोडून देतात? या आशयाचे ट्विट कंगनाने केले असून तिने सारावर निशाणा साधला आहे.

सुशांत आणि साराने ‘केदारनाथ’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. तसेच या चित्रपटातून साराने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक कपूरने केले. अभिषकने सुशांतला ‘काई पो चे’ या चित्रपटातून लाँच केले होते. त्यामुळे त्यांनी केदारनाथ या चित्रपटात पुन्हा एकत्र काम केले. केदारनाथ चित्रपटाच्या वेळी सुशांत आणि साराच्या अफेअरच्या रंगल्या होत्या. पण या चित्रपटानंतर ते कोणत्याही इवेंटमध्ये एकत्र दिसले नाहीत.

सुशांत आणि साराच्या अफेअरच्या चर्चा सुशांतचा मित्र सॅम्युअल होकिपने केलेल्या पोस्टमुळे पुन्हा सुरु झाल्या होत्या. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मला आजही आठवते केदारनाथ चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी सुशांत आणि सारा एकमेकांच्या प्रेमात होते. ते एकमेकांचा तितका आदरही करायचे आणि हा आदर फार कमी रिलेशनशीपमध्ये पाहायला मिळतो. सारा सुशांतसोबतच त्याच्या कुटुंबीयांचा, मित्रांचा तसेच त्याच्यासाठी काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आदर करायची. मात्र सुशांतचा सोनचिडिया हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि अचानक साराने ब्रेकअप केला. त्याच्या ब्रेकअपचे कारण मला आजही समजले नाही. त्यांचा ब्रेकअप बॉलिवूड माफियांच्या दबावामुळे झाला असावा असे म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2020 6:59 pm

Web Title: kangana ranaut slaims sara ali khan avb 95
Next Stories
1 “कोणी घर देतं का घर?” का म्हणते अभिनेत्री पूजा बिरारी
2 ‘जीव झाला येडापिसा’ आणि ‘राजा रानीची गं’ जोडी मालिकांमध्ये गणरायाचे आगमन!
3 ‘वैजू नंबर वन’ मालिकेच्या सेटवर बाप्पाचा थाट
Just Now!
X