28 February 2021

News Flash

आलियाचा फोटो पाहून कंगना संतापली; दीपिका-रणवीरवर साधला निशाणा

त्या मुर्ख मुलीसाठी इंडस्ट्री एकवटली; पण सुशांतसाठी....? कंगनाने केली जोरदार टीका

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने तिने आपल्या बालपणीचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या निरागस फोटोवर आलियाच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला. परंतु कंगना रनौतने मात्र याबाबत नाराजी व्यक्त केली. फोटोचं कौतुक करणाऱ्यांवर तिने निशाणा साधला आहे. ही तीच मंडळी आहेत ज्यांनी सुशांतसाठी न्याय मागितला नाही, अशी टीका तिने केली आहे.

कंगना रनौत सध्या बॉलिवूडमधील घराणेशाही आणि गटबाजीवर जोरदार शाब्दिक हल्ला करत आहे. यावेळी तिने आलियाच्या वाढदिवसाचं निमित्त साधून स्टार किड्सवर निशाणा साधला. तिने आपल्या टीमच्या ट्विटर हँडलवरुन आलियाला शुभेच्छा देणाऱ्या कलाकारांबाबत संताप व्यक्त केला. “हा आहे खरा खेळ. यांच्यापैकी एकाही स्टारकिड्सने सुशांतसाठी न्याय मागितला नाही. अन् आता त्या मूर्ख मुलीच्या फोटोसाठी पूर्ण इंडस्ट्री एकवटली आहे. व्वा रे व्वा” अशा आशयाचं ट्विट करुन कंगनाने आपला संताप व्यक्त केला.

कंगनाचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. यापूर्वी कंगनाने राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि करण जोहरवर टीका केली होती. “करण जोहर हा आदित्य ठाकरे यांचा खास मित्र असल्यामुळे त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आलं नाही. त्याऐवजी त्याच्या मॅनेजरची चौकशी झाली. सुशांतच्या हत्येची थट्टा करणं थांबवा.” अशा आशयाचं ट्विट तिने केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2020 5:33 pm

Web Title: kangana ranaut slams alia bhatts childhood pic mppg 94
Next Stories
1 ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याला जगायचंय फिल्मी स्टाइलमध्ये जीवन
2 सोनू सूदला सलाम! भाजी विकणाऱ्या इंजिनियर मुलीला दिली नोकरी
3 अरबी चाहत्याने धर्मेंद्र यांना दिलं खास गिफ्ट; व्हिडीओ पाहून व्हाल थक्क…
Just Now!
X