X
Advertisement

“आणि माझ्याबद्दल काही म्हणाल तर नागडं करेन”; इस्त्रायल मुद्द्यावरून ट्रोल करणाऱ्यांवर कंगना भडकली

'यामुळे' कंगना झाली होती ट्रोल.

सोशल मीडियावर वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे अभिनेत्री कंगना रणौतला अनेकदा ट्रोल करण्यात आलाय. त्यावर कंगनाने देखील ट्रोलर्सना बऱ्याचदा सडेतोड उत्तर दिलंय. कंगनाने नुकतीच इंस्टाग्राम अकाउंट वर एक पोस्ट शेअर केलीय. यात इस्त्रायलबद्दल कंगनाला असलेल्या ज्ञानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार्‍या ट्रोलर्सला तिने सडेतोड उत्तर दिलंय. गेल्या काही दिवसांपासून कंगना इस्त्रायल आणि पॅलेस्टाइनमध्ये सुरू असलेल्या वादावर तीच मत मांडत आहे.

सध्या कंगना इस्त्रायल वरील वक्तव्यावरून तिला ट्रोल करणार्‍यांचा समाचार घेत आहे. कंगनाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक नोट शेअर केली. यात ती म्हणाली,” तुम्ही सर्व व्हिडिओमध्ये स्पष्ट पाहू शकता की इस्त्रायलची स्थापना अगदी योग्यरीत्या झाली आहे. ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळवत त्यांनी युनायटेड नेशनच्या मदतीने या देशाची स्थापना केली आहे. सहा मुसलमान देशांनी त्यांच्यावर आक्रमण केली. या आक्रमणामध्ये प्रत्येक वेळी त्यांनी देशाच्या विविध भागावर ताबा मिळवला. अर्थातच जेव्हा तुम्ही युद्ध जिंकता तेव्हा असंच होतं. जे लोक रडत आहेत आणि म्हणत आहेत की मला काही माहीत नाही, तर बाळांनो मी सर्वांची आई आहे.त्यामुळे यापुढे लायकीत रहा.”

(photo-instagram@kanganaranaut)

पुढे ती म्हणाली,”तुम्ही असं कसं इस्त्रायलला बेकायदेशीर म्हणू शकता.या जगात त्यांचं स्थान नाही का? सर्व जगाला मूर्ख बनवून ठेवलंय. फक्त गुंडगिरी करायची आणि समोरून कुणी केली तर मात्र रडून गोंधळ घालायचा. संपूर्ण जगाला डोक्यावर घ्यायचं. मूर्ख लोकांचा आणि मीडियाचा वापर करून गोंधळ निर्माण करायचा. जरा लाज बाळगा संपूर्ण जगासमोर तुमचा पर्दाफाश झाला आहे आणि मझ्याबद्दल जर बोलाल तर नागडं करून टाकेन.” असं म्हणत कंगनाने ट्रोल करणाऱ्यांची बोलती बंद केलीय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

गंगा नदीत आढळलेल्या मृतदेहांबद्दल कंगनाने केलेल्या एका वक्तव्यामुळे नुकतच तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं. वायरल होणारा व्हिडीओ हा नायजेरियाचा असल्याचं वक्तव्य कंगनाने केलं होतं.

20
READ IN APP
X