News Flash

करण जोहरची बाजू घेणाऱ्या स्वराला ‘चापलूस’ म्हणत कंगनाचा टोला

करणचा व्हिडीओ पोस्ट करत स्वराने केलं त्याचं कौतुक

कंगना रणौत, स्वरा भास्कर

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवरून वाद सुरू झाला. घराणेशाहीवरून सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोप होतच आहेत. अभिनेत्री कंगना रणौतने याआधीही घराणेशाहीच्या मुद्द्यावर निर्माता-दिग्दर्शक करण जोहरवर निशाणा साधला होता. करण जोहरवर नेटकऱ्यांकडून जोरदार टीका होत असताना अभिनेत्री स्वरा भास्करने त्याची बाजू घेतली. स्वराने करणची बाजू घेतल्याने कंगनाने तिला ‘चापलूस’ म्हणत टोला लगावला आहे.

स्वराने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं की, ‘एखाद्याच्या मृत्यूसाठी इंडस्ट्रीतल्या लोकांना जबाबदार ठरवणं खूप चुकीचं आहे.’ यासोबतच स्वराने करण जोहरचा व्हिडीओसुद्धा शेअर केला होता. त्याला उत्तर देत कंगना म्हणाली, “स्वराने चापलूसी करण्यापूर्वी हे लक्षात ठेवावं की कंगनाकडे अनेकदा विनंती करण्यात आली होती. म्हणून तिने त्या शोमध्ये भाग घेतला होता. ती सुपरस्टार आहे आणि करण जोहर एक पेड होस्ट.”

स्वराने करण जोहरचा व्हिडीओ शेअर करत लिहिलं होतं, ‘एका क्षणासाठी थांबूया आणि करण जोहरने प्रश्नाचं उत्तर दिल्याबद्दल त्याचं कौतुक करुया. करण त्याच्या शोमधून घराणेशाहीचा मुद्दा एडिट करू शकला असता, काढून टाकू शकला असता. मात्र त्याने असं केलं नाही.’ स्वराच्या याच मुद्द्यावर कंगनाचा राग अनावर झाला आणि तिने स्वराला ‘चापलूस’ म्हटलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 5:50 pm

Web Title: kangana ranaut slams swara bhasker ssv 92
Next Stories
1 ‘मला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता’- प्रियांका चोप्रा
2 करोनाचा हाहाकार आता रुपेरी पडद्यावर; ऑस्कर विजेता लेखक करतोय चित्रपट
3 हरियाणा ते बिहार, १२०० किमी चा प्रवास सायकल प्रवास करणाऱ्या ज्योतीची कहाणी रुपेरी पडद्यावर
Just Now!
X