News Flash

“स्वार्थ असल्याशिवाय ती कोणाच्याही बाजूने बोलत नाही”; सोना मोहापात्राने केली कंगनावर टीका

कंगना रणौत अत्यंत स्वार्थ प्रवृत्तीची व्यक्ती; मैत्रीणीनेच केली जोरदार टीका

अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सध्या प्रचंड चर्चेत आहे. महाराष्ट्र सरकार आणि बॉलिवूड सिनेसृष्टीवर ती सातत्याने आरोप करत आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना तर तिने थेट सॉफ्ट पॉर्नस्टार असं म्हटलं होतं. तिच्या या वादग्रस्त वक्तव्यांवर गायिका सोना मोहापात्रा हिने प्रतिक्रिया दिली. कंगनाने आजवर कधीही वैयक्तिक फायद्याशिवाय इतर दुसऱ्या कोणासाठी आवाज उठवलेला नाही, असं म्हणत सोनाने कंगनावर निशाणा साधला आहे.

अवश्य पाहा – सुशांत मृत्यू प्रकरणावर येतोय चित्रपट; ही अभिनेत्री साकारणार रिया चक्रवर्तीची भूमिका

“कंगना स्वार्थी प्रवृत्तीची आहे. आजवर तिने कधीही वैयक्तिक फायद्याशिवाय इतर दुसऱ्या कोणासाठी आवाज उठवलेला नाही. ज्या लोकांनी तिला पाठिंबा दिला त्यांना देखील ती विसरुन गेली. केवळ तिने इंडस्ट्रीमध्ये सुरु असलेल्या वाईट गोष्टींवर बोट ठेवलं एवढंच तिचं धाडस आहे.” अशा आशयाचं ट्विट करुन सोना मोहापात्रा हिने कंगनावर जोरदार टीका केली. यापूर्वी देखील तिने कंगनावर निशाणा साधला होता. परंतु कंगनाने तिला थेट ब्लॉक करुन टाकलं होतं. दरम्यान सोनाचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – हे घर आहे की राजवाडा?; पाहा सुझान खानचं कोट्यवधींचं घर

यापूर्वी काय म्हणाली होती कंगना?

‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत कंगना रणौतने उर्मिला मातोंडकर यांना सॉफ्ट पॉर्न करणारी अभिनेत्री असं म्हटलं होतं. “उर्मिला मातोंडकर या सॉफ्ट पॉर्न स्टार आहेत. त्या त्यांच्या अभिनयासाठी नक्कीच ओळखल्या जात नाहीत. कशामुळे ओळखल्या जातात मग? सॉफ्ट पॉर्नसाठीच ना? जर त्यांना तिकिट मिळू शकतं तर मला का नाही मिळणार? कोणालाही तिकिट मिळू शकतं.” अशी टीका तिने केली होती. या टीकेमुळे बॉलिवूड विरुद्ध कंगना असा सुरु असलेला वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2020 5:06 pm

Web Title: kangana ranaut sona mohapatra bollywood drugs case mppg 94
Next Stories
1 लता मंगेशकर यांच्या संगीताच्या प्रवासाचा सखोल अभ्यास
2 वजनदार ‘डान्सिंग क्वीन’ची बॅकस्टोरी
3 अपूर्व लाखिया दिग्दर्शित ‘क्रॅकडाउन’ वेब सीरिजला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद
Just Now!
X