News Flash

कंगना आणि तिच्या भाच्याची मस्ती पाहिली का?

फोटो पाहून ती दोघं किती दंगा करत असतील याचा अंदाज येतो

कंगना रणौत सध्या तिच्या भाच्यासोबत अर्थात पृथ्वीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवत आहे. कंगनाची बहिण रंगोलीने सोशल मीडियावर कंगना आणि पृथ्वीचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून ती दोघं किती दंगा करत असतील याचा अंदाज येतो. कंगना आणि पृथ्वीने गडद निळ्या रंगाचे शर्ट घातले आहे. पृथ्वीसोबत मस्ती करतानाचा आनंद कंगनाच्या चेहऱ्यावर लख्ख दिसत आहे. फोटोत कंगना पृथ्वीला बाटलीतून दूध पाजताना दिसत आहे. कंगना आणि पृथ्वीमध्ये अनोखं नातं तयार होत असल्याचे या फोटोत स्पष्ट जाणवते.

कंगनाची बहिण रंगोली सोशल मीडियावर फार सक्रीय आहे. कंगना आणि रंगोली या दोन्ही बहिणींमध्ये कमालीचे नाते आहे. पृथ्वीचा जन्म गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झाला. ४ महिन्यांचा पृथ्वी फारच गोंडस आहे. त्याच्या हसण्यावर अनेकजण भारळे आहेत. रंगोलीने आतापर्यंत पृथ्वीचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून कंगना पृथ्वीसोबत तिच्या मनाली येथील नव्या घरी राहत आहे. सध्या कंगनाचे मनाली येथील घर फार चर्चेत आहे. कंगनाचा हा बंगला ३० कोटी रुपये खर्च करुन बनवण्यात आला आहे. कंगनाने या बंगल्याचे नाव कार्तिकेय निवास असे ठेवले आहे.

दरम्यान, बॉलिवूडची ही ‘क्वीन’ तिच्या सिनेमांमुळे जेवढी चर्चेत येते त्याहून जास्त तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत येते. ठाण्यातील बेकायदा कॉल तपशिल (सीडीआर) प्रकरणात तिचे नावही समोर आले आहे. कंगनाने अभिनेता हृतिक रोशनचे सीडीआर बेकायदेशीररित्या खासगी गुप्तहेरामार्फत मिळवल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. यामुळे कंगना अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. कंगनाने हृतिक रोशनचे सीडीआर बेकायदेशीररित्या खासगी गुप्तहेरामार्फत मिळवले होते. तिने हृतिकचा मोबाइल नंबर वकील रिजवान सिद्दीकीला दिल्याची प्राथमिक माहिती समोर आल्याचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी सांगितले. पोलीस अधिक चौकशी करत असल्याचेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2018 7:35 pm

Web Title: kangana ranaut spends happye time with nephew prithvi see adorable pictures
Next Stories
1 Shikari Trailer: ऐन उन्हाळ्यात ‘हिट’ वाढवणारा ‘शिकारी’ चित्रपटाचा ट्रेलर
2 सलमानला भेटण्यासाठी मुंबईत पळून आली १५ वर्षांची मुलगी
3 सुपरहिट ‘बबन’ने गाठला ८.५ कोटींचा पल्ला
Just Now!
X