02 April 2020

News Flash

कोट्यवधींची कमाई करुनही कंगना नेसते ६०० रुपयांची साडी

कंगना अत्यंत साधेपणाने आयुष्य जगत असल्याचं समोर आलं आले

कंगना रणौत

चौकटीबाहेरच्या भूमिका साकरण्यास प्राधान्य देणारी अभिनेत्री कंगना रणौत अनेक वेळा चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असते. मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झासी या चित्रपटातून आपलं वेगळेपण सिद्ध करणारी कंगना आज कोट्यवधींची कमाई करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. मात्र कोट्यवधींची कमाई करुन देखील कंगना अत्यंत साधेपणाने आयुष्य जगत असल्याचं समोर आलं आले. सध्या सोशल मीडियावर कंगनाचा एक फोटो व्हायरल होत असून या फोटोमध्ये कंगनाने जी साडी नेसली आहे, ती चक्क ६०० रुपयांची असल्याचं पाहायला मिळत आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ती त्यांची लक्झरी लाइफ आणि महागडे किंमतीच्या वस्तू. अनेक वेळा हे सिलिब्रिटी त्यांच्या लक्झरी लाइफमुळेच चर्चेत येत असतात. मात्र कंगना तिच्या साधी रहाणीमानामुळे चर्चेत आली आहे. सध्या सोशल मीडियावर कंगनाचा विमानतळावरील एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये कंगनाने चक्क ६०० रुपयांची साडी परिधान केली आहे.

काही दिवसापूर्वी कंगनाला विमानतळावर स्पॉट करण्यात आलं होतं. यावेळी कंगनाने मोठी बॉर्डर असलेली पेस्टल रंगाची साडी नेसली होती. त्यावर तिने काळ्या रंगाचा एक ओव्हरकोटही कॅरी केला होता. विशेष म्हणजे अत्यंत महागडी वाटत असणारी ही साडी प्रत्यक्षात मात्र फक्त ६०० रुपयांची होती. कंगनाची बहिण रंगोली चंडेलाने ही माहिती ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांना दिली.

“जयपूरला जातांना कंगनाने जी साडी नेसली होती ती केवळ ६०० रुपयांची होती. ही साडी कंगनाने कोलकातामधून खरेदी केली होती. ज्यावेळी कंगनाने ही साडी खरेदी करताना तिची किंमत ऐकली होती ते पाहून तिला प्रचंड वाईट वाटलं होतं. अत्यंत सुंदर पद्धतीने तयार करण्यात आलेल्या या साडीसाठी अनेकांनी मेहनत घेतली होती.मात्र त्यांच्या मेहनतीच्या तुलनेत त्यांना इतकी कमी रक्कमेमध्ये तिची विक्री करावी लागत होती”, असं रंगोलीने सांगितलं.

दरम्यान, हे ट्विट करण्यासोबतच तिने हातमाग करणाऱ्या कामगारांच्या कामाला प्रोत्साहन देण्याची विनंतीही केली आहे. सध्या कंगना तिच्या आगामी ‘धाकड’ या चित्रपटात व्यस्त असून या चित्रपटामध्ये ती मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2019 5:38 pm

Web Title: kangana ranaut spotted wearing rupees 600 saree at airport ssj 93
Next Stories
1 ‘मिशन मंगल’च्या यशानंतर जॉनने दिल्या शुभेच्छा, अक्षयच्या रिप्लायने जिंकली चाहत्यांची मनं
2 सोनम कपूरला पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिल्यावर ती म्हणते..
3 हिना खानने विदेशात फडकावला भारताचा झेंडा
Just Now!
X