अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूडमधील घराणेशाही ते देशभरातील राजकारण अशा विविध विषयांवर ती रोखठोकपणे आपली भूमिका मांडते. यावेळी ती स्वामी विवेकानंद यांच्यामुळे चर्चेत आहे. आज स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे. या निमित्तानं कंगनाने एक ट्विट केलं आहे. हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

स्वामी विवेकानंद तिचे गुरु आहेत, असा दावा करत कंगनाने देशभरातील लोकांना त्यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही मला लढण्याची प्रेरणा दिली. जेव्हा मी नैराश्येत होते तेव्हा तुम्ही मला जगण्यासाठी उद्देश दिलात. तुम्ही माझे इश्वर आहात. अन् तुम्हीच माझे गुरु.” अशा आशयाचं ट्विट करत कंगनाने स्वामी विवेकानंद यांना अभिवादन केलं आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

‘त्या’ आजींविषयी ट्विट करणं आलं होतं कंगनाच्या अंगलट

शेतकरी आंदोलनातील एक आजी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आल्या असून अभिनेत्री कंगना रणौतने त्यांची तुलना शाहीन बाग प्रकरणातील बिलकिस दादी यांच्यासोबत केली. त्यामुळे कंगनावर ट्रोल होण्याची वेळ आली होती. कंगनाने अलिकडेच या आजींसदर्भातील एक ट्विट शेअर केलं होतं. मात्र, त्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल केलं. सोशल मीडियावर सुरु झालेल्या ट्रोलिंगनंतर कंगनाने तिचं हे ट्विट डिलीट केलं. मात्र, ट्विटरवर #DaadiSeMaafiMangKangana हा हॅशटॅग चांगलाच व्हायरल झाला होता.