News Flash

“ज्या हातांनी भरवलं ते हात कापायचे नसतात”; स्वरा भास्करचं कंगनाला प्रत्युत्तर

मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरशी करणाऱ्या कंगना रणौतवर स्वरा भास्कर संतापली

अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ती मुंबई प्रकरणामुळे चर्चेत आहे. अलिकडेच केलेल्या एका ट्विटमध्ये तिने मुंबई ही तिला पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटू लागली आहे, असं खळबळजनक वक्तव्य केलं होतं. शिवाय बॉलिवूडमधील ९० टक्के कलाकार अंमली पदार्थांचं सेवन करतात असंही ती म्हणाली. तिच्या या वक्तव्यांवर अभिनेत्री स्वरा भास्कर हिने नाराजी व्यक्त केली आहे. ज्या हातांनी तिला अन्न भरवलं तेच हात आता कंगना कापू पाहतेय, अशी टीका स्वराने केली आहे.

ड्रग्स प्रकरणात अभिनेत्री संजना गलरानी अटक; ४ दिवसांत दुसरी अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात

एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत स्वराने कंगना रणौतवर निशाणा साधला. “या बॉलिवूडनेच कंगनाला खरी ओळख मिळवून दिली. मुंबईनेच तिला दोन वेळचं अन्न मिळवून दिलं. आणि आता ती अन्न भरवणाऱ्या हातांनाच कापण्याचा प्रयत्न करतेय. कुठल्याही पुराव्यांशिवाय बॉलिवूडवर आरोप करतेय. हे सगळं दुवैवी आहे.” असं म्हणत तिने कंगनाच्या वक्तव्यांवर नाराजी व्यक्त केली.

“तुम्ही स्वत:ला शेरलॉक होम्स समजता का?”; सोन्या अयोध्या ट्रोलर्सवर भडकली

यापूर्वी काय म्हणाली होती कंगना रणौत?

“बॉलिवूडमधील जवळपास ९९ टक्के कलाकार अंमली पदार्थांचं सेवन करतात. या सर्व कलाकारांची चौकशी व्हायला हवी. ज्याप्रमाणे करोना चाचणी निगेटिव्ह आल्याशिवाय कुठलाही कलाकार शूटिंगला जाऊ शकत नाही. अगदी त्याच प्रमाणे अंमली पदार्थांची चाचणी निगेटिव्ह आल्याशिवाय कोणत्याच कलाकाराला काम करण्याची परवानगी मिळता कामा नये. यासाठी सरकारने नवे कायदे तयार करावे. व अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्या कलाकारांवर कडक कारवाई करावी.” असं कंगना म्हणाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2020 3:01 pm

Web Title: kangana ranaut swara bhaskar drugs in bollywood mppg 94
Next Stories
1 ‘जे पेराल तेच उगवेल’; रियाला अटक होताच शेखर सुमन यांची प्रतिक्रिया
2 नव्या भूमिकेसाठी प्राजक्ता गायकवाड सज्ज; घेतीये ‘ही’ खास मेहनत
3 ‘आई कुठे काय करते’ मालिकेत येणार नवं वळण
Just Now!
X