27 May 2020

News Flash

Video: सिगारेटचे व्यसन सोडवण्यासाठी कंगनाने लढवली ‘ही’ शक्कल

सिगारेटच्या व्यसनाने कंगनाला गुलाम केलं होत.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती नेहमीच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. यावेळी कंगना चक्क तिच्या धुम्रपानाच्या सवयीमुळे चर्चेत आहे. सिगरेटच्या व्यसनाने तिला जणू गुलामच केले होते. मात्र या व्यसनातून ती कशी मुक्त झाली? हा अनुभव तिने एका व्हिडीओच्या माध्यमातून सांगितला आहे.

काय म्हणाली कंगना?

“मी १९ वर्षांची होते. त्यावेळी ‘वो लम्हे’ या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदा माझ्या हातात सिगारेट आली. या चित्रपटात मी ज्या मुलीची व्यक्तिरेखा साकारत होते, त्या मुलीला सिगरेटचे व्यसन होते. त्यामुळे पटकथेच्या मागणीनुसार मी सिगारेट ओढण्यास सुरुवात केली. त्यावेळी सेटवर उपस्थित असलेल्या सर्वांनी मला सिगरेटपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र या गोष्टीकडे मी दुर्लक्ष केले. त्यानंतर चित्रपट संपेपर्यंत हळूहळू मला सिगरेटचं जणू व्यसनच लागलं. सिगारेट मिळाली नाही तर मी बेचैन व्हायचे. दिवसाला १२ ते १५ सिगारेट मी ओढत होते. धुम्रपानाच्या सवयीने जणू मला गुलाम केले की काय असं वाटू लागलं. अखेर माझ्या गुरुंच्या मदतीने मी प्रयत्न पुर्वक सिगरेटपासून दूर झाले.” असा अनुभव कंगनाने या व्हिडीओमध्ये सांगितला आहे.

राम नवमीच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला हा व्हिडीओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी कंगनाचे कौतुक देखील केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2020 3:40 pm

Web Title: kangana ranaut talking about her smoking addiction mppg 94
Next Stories
1 …म्हणून राम गोपाल वर्मा यांनी केले होते करोनाची लागण झाल्याचे ट्विट
2 कनिकाच्या कुटुंबीयांनी सांगितलं त्या ११ दिवसांमध्ये काय झालं होतं
3 “दिवे पेटवून देशाची अर्थव्यवस्था सुधारणार का?”; फराह खानचा मोदींना सवाल
Just Now!
X