News Flash

कंगना झाली ट्रोल, नव्या चित्रपटाच्या लूकवरुन नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

‘थलैवी’ हा बायोपिक तामिळ, तेलुगू आणि हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

बॉलिवूडची क्विन कंगना रानौत सध्या ‘थलैवी’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात कंगना जयललिता यांची भूमिका साकारत आहे. कंगनाची बहिण रंगोली चंडेल हिने हा फर्स्ट लूक ट्विटरवर पोस्ट केला. मात्र नेटकऱ्यांना कंगनाचा हा नवा लूक फारसा पसंत पडलेला नाही. त्यांनी सोशल मीडियावर कंगनाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

‘थलैवी’ हा बायोपिक तामिळ, तेलुगू आणि हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी कंगनाने २० कोटी रुपये मानधन स्वीकारल्याचं समजतंय. जयललिता यांच्याप्रमाणे हुबेहूब दिसण्यासाठी कंगनाने प्रचंड मेहनत घेतली असून तिला प्रोस्थेटिक मेकअपचा आधार घ्यावा लागला होता. या मेकअपचे काही फोटो काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. २६ जून २०२० रोजी हा बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 25, 2019 1:27 pm

Web Title: kangana ranaut thalaivi first look starts a meme on social media mppg 94
Next Stories
1 गोविंदा आणि जॅकी श्रॉफ यांना न्यायालयाने ठोठावला दंड
2 शाहरूख खाननं दिल्या अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितेला लग्नाच्या शुभेच्छा
3 ‘पानिपत’चे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या सुरक्षेसाठी २०० पोलीस तैनात
Just Now!
X