News Flash

Birthday special: ‘थलायवी’साठी कंगनाचा कायापालट, वाढवलं 20 किलो वजन

कंगना म्हणाली भूमिकेसाठी करावी लागली मोठी मेहनत

(Photo: Instagram@Kangana Ranaut)

वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना रणौत सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. बेधडक विधानं आणि आरोप प्रत्यारोपांमुळे कंगनाला अनेकदा ट्रोल व्हावं लागतं.

कंगन लवकरच तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललीता यांच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे. 23 मार्चला कंगनाच्या वाढदिवसाचं निमित्त साधत ‘थलायवी’ या सिनेमाचा पहिला ट्रेलर रिलिज होणार आहे. या सिनेमासाठी कंगनाला बरीच मेहनत घ्यावी लागल्याचं तिने सांगितलं आहे. मात्र ट्रेलर रिलीजपूर्वीच कंगना नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलीय.

या सिनेमातील विविध लूकमधील अनेक फोटो कंगनाने आजपर्यंत शेअर केले आहेत. नुकतेच कंगनाने तिच्या थलायवी सिनेमातील काही खास फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने भूमिकेसाठी वजन वाढवून ते पुन्हा कमी करण्याच्या प्रवासाबद्दल सांगितलं आहे.

कंगनाने तिच्या ट्विटर अकाऊंटवर फोटो शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये ती म्हणाली, ” थलायवीचं ट्रेलर रिलीज होण्यासाठी एक दिवस बाकी आहे. या सिनेमासाठी 20 किलो वजन वाढवणं आणि काही दिवसातच ते कमी करणं हे एकमेव चॅलेंज माझ्यासमोर नव्हत. काही तासांत प्रतिक्षा संपेल. जया कायमची तुमची होणार आहे.”अशी पोस्ट तिने लिहली आहे. कंगनाच्या या ट्विटनंतर अनेकांनी तिला ट्रोल केलं. काहींनी तिच्याकडे वजन कमी करण्याचा सल्ला मागितला आहे. तर काहींनी “खोट बोलतेय बॉडीसूट घातलाय.” अशा कमेंट केल्या आहेत.

कंगनाने शेअर केलेल्या फोटोंपैकी पहिले दोन फोटो हे जयललीता या अभिनेत्री असतानाचा काळ दाखवत आहेत. तर तिसऱ्या फोटोत जेव्हा त्यांनी राजकारणात प्रवेश केला तेव्हाचा लूक दिसतोय.

‘थलायवी’ सिनेमासाठी कंगनाला बरेच कष्ट घ्यावे लागले. तिने उत्कृष्ट भूमिका साकारण्यासाठी कशा प्रकारे मेहनत घेतली. हे अनेकदा तिच्या ट्विटमधून सांगितलं आहे. यासाठी बऱ्याचदा तिला ट्रोलही व्हावं लागलं. याआधी कंगनाने काही फोटो शेअर करत “या संपूर्ण जगात माझ्यासारखी वेगवेगळी भूमिका साकारण्याची प्रतिभा कोणामध्ये असेल तर मी माझा अहंकार सोडून देईन. तोपर्यंत मी नक्कीच अहंकारात राहू शकते.” असं ट्वीट केलं होतं. या ट्वीटमुळे कंगनाला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं होतं.

तर थलायवी सिनेमाचे दिग्दर्शक विजय यांच्यासाठी लिहलेल्या पोस्टमुळे देखील कंगना चर्चेत आली होती. सिनेमाच्या सेटवरचे काही फोटो शेअर करत तिने दिग्दर्शक विजय यांना देवता म्हंटलं होतं.

कंगना रणौतला सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार

दरम्यान, वाढदिवसाच्या एक दिवस आधीच कंगनाला सर्वोत्तम अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे. ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी’ आणि ‘पंगा’ या चित्रपटांसाठी कंगनाला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2021 4:07 pm

Web Title: kangana ranaut troll before releasing thalaivi trailer on her weight gain journey kpw 89
Next Stories
1 सिद्धार्थ चांदेकर पुन्हा एकदा बोहल्यावर!; हिच्याशी बांधणार लग्नगाठ
2 बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा लवकरच करणार दुसरे लग्न!
3 करण आणखी एका स्टार किडला करणार लॉन्च; शनाया करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण
Just Now!
X