News Flash

‘फाटकी जीन्स आणि ब्लाउज…’, कंगनाने केलं दीपिकाला ट्रोल

जाणून घ्या सविस्तर

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगना बिनधास्तपणे तिचं मत मांडताना दिसते. सोशल मीडियावरील पोस्टमुळे अनेकदा ती वादातही अडकली आहे. आता कंगनाने बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदूकोणला टोला लगावला आहे.

कंगनाने एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये तिने दीपिकाला टोला लगावला आहे. या ट्विटमध्ये तीन महिला आहेत. हा फोटो १८८५ चा असल्याचे त्यात म्हटले आहे. या तीनही महिला त्यांच्या त्यांच्या देशातल्या पहिल्या डॉक्टर असल्याचे हे सांगण्यात येत आहे. तर त्यात एक महिला ही भारत, दुसरी महिला जपान, तर तिसरी महिला ही सीरियाची आहे. या तीनही महिलांनी त्यांचा पारंपरिक पोशाख परिधान केला आहे. “एक ट्विट या महिलांसाठी ज्यांनी फक्त त्यांच व्यक्तिमत्तवच नाही तर संपुर्ण सभ्यता, संस्कृती आणि राष्ट्राचे प्रतिनिधित्व केलं आहे. आजच्या जगात अशा महिलांचे फोटो काढले, तर त्या फाटलेल्या अमेरिकन जीन्स आणि चिंध्यांसारखे ब्लाउज परिधान करतात. या महिला अमेरिकेचे मार्केटिंग करण्यापलिकडे काहीही करत नाही.” अशा आशयाचे ट्विट कंगनाने केले आहे. कंगनाच्या या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी कंगनाला ट्रोल केले आहे.

कंगनाने दीपिकावर अशी टिका का केली?

दीपिका नुकतीच Levi’s Jeans या अमेरीकन जीन्स कंपनीची ग्लोबल ब्रॅंड अ‍ॅम्बेसेडर बनली आहे. या ब्रॅंडच्या जाहिरातीसाठी दीपिकाने इन्स्टाग्रामवरून एक व्हिडीओ शेअर केला होता. हे पाहताच कंगनाने तिच्यावर टिका केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

तर कंगना लवकरच ‘थलाइवी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकारणार आहे. तसेच तिचा ‘धाकड’ हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2021 3:39 pm

Web Title: kangana ranaut trolled deepika padukone for advertising levis brand dcp 98
Next Stories
1 ओटीटी प्लॅटफॉर्मवर पॉर्नोग्राफी दाखवली जातेय; सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता
2 ‘माझ्या वडिलांसाठी प्रार्थना करा’, गौहर खानवर कोसळला दु:खाचा डोंगर
3 ‘दसवी’मध्ये अभिषेकचा थाट, गंगारामचा रुबाब तर पहा!
Just Now!
X