News Flash

“……आणि माझ्या चेहऱ्यावर पटकन हसू खुललं”, कंगना रणौतचं नवीन ट्विट

ट्विटसोबत कंगनानं एक फोटोही शेअर केला आहे

अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं कायम चर्चेत असते. ट्विटरवर ती अनेक सामाजिक बाबींवर भाष्य करत असते, टीकाटिप्पणी करत असते. आजही तिने एक ट्विट केलंय. मात्र ही कोणावरही टीका नाही किंवा कुठलंही वादग्रस्त वक्तव्य नाही. तिने जी गोष्ट शेअर केली आहे, ते पाहून तिच्या चेहऱ्यावर हसू खुलल्याचं ती सांगतेय.

कंगनाने नुकतंच आपल्या ‘धाकड’ या सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण केलं आहे. आता ती एका नवीन प्रोजेक्टसाठी काम करत आहे. तिने नुकतंच सोशल मीडियावर जाहीर केलं की तिने या नवीन प्रोजेक्टसाठी लूक टेस्ट दिली आणि शूटिंगलाही सुरुवात करायला सज्ज आहे. कंगनाचा हा नवा प्रोजेक्ट म्हणजे ‘तेजस’ हा चित्रपट आहे. लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरुवात होईल. या चित्रपटाचे दिग्दर्शन सर्वेश मेवाडा करत आहेत. या चित्रपटात कंगना भारतीय वायू सेनेच्या अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. अलीकडेच केलेल्या एका पोस्टमध्ये तिने सांगितलं की या चित्रपटात तिची भूमिका एका शीख सैनिकाची आहे हे तिला आत्तापर्यंत माहित नव्हतं.

आपल्या ट्विटर अकाऊंटवरून तिने एक फोटो शेअर केलाय, ज्यात या पात्राचं नाव ‘तेजस गिल’ दिसत आहे आणि ते युनिफॉर्मवर लिहिलेलं आहे. कंगना आपल्या ट्विटमध्येही म्हणाली आहे, “जोवर मी पात्राचं नाव पूर्ण वाचलं नव्हतं तोवर मला हे माहित नव्हतं की मी शीख सैनिकाची भूमिका साकारणार आहे. पण ज्यावेळी मी हे नाव पूर्ण वाचलं त्यावेळी माझ्या चेहऱ्यावर हसू खुललं. आपल्या इच्छा, आकांक्षा, प्रेम हे प्रकट होण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. हे विश्व आपल्याला कळणाऱ्या माध्यमांपेक्षाही अधिक माध्यमांतून आपल्याशी संवाद साधत असतं.”

कंगनाने नुकतंच ‘धाकड’ या ऍक्शनपटाचं आणि जयललिता यांच्या बायोपिकचं म्हणजे ‘थलायवी’चं चित्रीकरण पूर्ण केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2021 6:39 pm

Web Title: kangana ranaut tweeted about her upcoming movie vsk 98
Next Stories
1 नव्या चित्रपटात दिसणार कधी न पाहिलेल्या रुपात; साऊथ सुपरस्टार प्रभासची घोषणा
2 राणा डग्गुबातीचा ‘हाथी मेरे साथी’ प्रदर्शनासाठी सज्ज; ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
3 “मला त्यांना रिप्लाय द्यावासा वाटत होता”- वडिलांच्या मेसेजने इरफानचा मुलगा भावूक
Just Now!
X