पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारताचा चीन विरुद्ध रक्तरंजित संघर्ष झाला. या संघर्षात भारताचे २० सैनिक शहिद झाले. परिणामी भारत-चीन संबंधात तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान चीनला धडा शिकवण्यासाठी देशवासीयांनी चिनी उत्पादनावर बंदी घालावी अशी विनंती अभिनेत्री कंगना रनौतने देशवासीयांना केली आहे.

अवश्य पाहा – अखेरच्या काळात पंचमदांना काम का मिळालं नाही?; जावेद अख्तर म्हणाले…

कंगनाने एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओव्दारे तिने चीनवर टीका केली आहे. ती म्हणाली, “आपले सैनिक आपल्याला चिनी हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी सिमेवर संघर्ष करत आहेत. मात्र आपण चिनी उत्पादनांचा वापर करुन चीनला आर्थिक मदत करत आहोत. याच पैशांचा वापर ते आपल्या विरोधात करतात. त्यामुळे चिनी उत्पादनांचा वापर थांबवून आपण आपल्या सैनिकांची मदत करायला हवी.” अशा आशयाची विनंती कंगनाने या व्हिडीओद्वारे केली आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – “सलमानला खरंच कलाकार म्हणावं का?”; Wikipedia पेज पोस्ट करुन अभिनेत्याने उडवली खिल्ली

भारत-चीन सीमेवर सुरु असणाऱ्या हिंसक घटनांमध्ये अनेकदा चीनकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा दावा तिबेट प्रशासनाचे अध्यक्ष लोबसांग सांगे यांनी केला आहे. “चर्चेमधून प्रश्न सोडवणे हाच एकमेव मार्ग आहे. भारताला आपल्या प्रदेशाची आणि सर्वभौमत्वाचे संरक्षण करण्याचा अधिकार आहे. चीनचे धोरण हे काठीला लावलेल्या गाजराप्रमाणे आहे. (जेवढं आपण जवळ जाण्याचा प्रयत्न करु तेवढं काठीला बांधलेलं गाजर लांब जाणार.) भारतानेही अशाच धोरणाचा अवलंब केला पाहिजे. मात्र भारताने घुसखोरीचा मार्ग निवडू नये,” अशी अपेक्षा सांगे यांनी व्यक्त केली.