28 October 2020

News Flash

“ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग”; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया

अमेरिकेतील निवडणूकीच्या रणधुमाळीत कंगनाची उडी?

अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सध्या प्रचंड चर्चेत आहे. महाराष्ट्र सरकार आणि बॉलिवूड सिनेसृष्टीवर ती सातत्याने आरोप करत आहे. बॉलिवूडमधील ९० टक्के कलाकार अंमली पदार्थांचं सेवन करतात असंही ती म्हणाली होती. त्यानंतर आता तिने ड्रग्जच्याच मुद्द्यावरुन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली आहे. “ड्रग्जचा आरोप हा कुठल्याही व्यक्तीच्या चरित्रावर पडलेला काळा डाग असतो”, असं ती म्हणाली.

अवश्य पाहा – सुशांत मृत्यू प्रकरणावर येतोय चित्रपट; ही अभिनेत्री साकारणार रिया चक्रवर्तीची भूमिका

अमेरिकेत सध्या राष्ट्राध्यक्ष निवडणूकीचे वारे वाहात आहेत. निवडणूकीला उभे राहिलेले उमेदवार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. या निवडणूकीतही ड्रग्जचा मुद्दा चर्चेत आहे. दरम्यान प्रतिस्पर्धी जो बिडन यांनी आपली ड्रग्ज टेस्ट करावी अशी मागणी ट्रम्प यांनी केली. त्यांच्या या मागणीवर कंगना रणौतने प्रतिक्रिया दिली. “या ट्विटमध्ये जे लिहिलं आहे त्याच्याशी मी सहमत नाही. पण ज्या कॉन्टेक्स्टमध्ये लिहिलंय त्याला मात्र माझा पाठिंबा आहे. ड्रग्जचा आरोप हा कुठल्याही व्यक्तीच्या चरित्रावर पडलेला काळा डाग असतो. आपण एक समाज म्हणून ड्रग्जची समस्या संपवण्यासाठी काहीतरी उपाययोजना करायला हव्या.” असं ट्विट कंगनाने केलं आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – हे घर आहे की राजवाडा?; पाहा सुझान खानचं कोट्यवधींचं घर

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत ‘बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण’ समोर आलं आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाद्वारे या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. चौकशीदरम्यान सारा अली खान, रकुल प्रित सिंह, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, दीपिका पदुकोण, दिया मिर्झा, अबिगल पांडे यांसारख्या अनेक नामांकित अभिनेत्रींची नावं समोर आली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2020 11:36 am

Web Title: kangana ranaut us president donald trump joe biden drug probe in bollywood mppg 94
Next Stories
1 ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ
2 Happy Birthday Lata Mangeshkar : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं खरं नाव माहित आहे का?
3 करण जोहरच्या घरातील ‘त्या’ पार्टीबाबत होणार का चौकशी? एनसीबीचे अधिकारी म्हणाले…
Just Now!
X