News Flash

सहा महिन्यांनी त्या ऑफिसमध्ये पोहोचली कंगना, शेअर केला Before and after फोटो

फोटो शेअर करत तिने 'माझं हृदय तुटलं' या आशयाचे कॅप्शन दिले आहे

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगना बिनधास्तपणे तिचं मत मांडताना दिसते. सोशल मीडियावरील पोस्टमुळे अनेकदा ती वादातही अडकली आहे. आता कंगनाने सहा महिन्यांपूर्वी बीएमसीने तोडलेल्या ‘मणिकर्णिका’ ऑफिसाला भेट दिली आहे. तेथील काही फोटो देखील तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

कंगनाने ट्विटरवर मुंबईमधीव मणिकर्णिका ऑफिसचे फोटो शेअर केले आहे. या फोटोंमध्ये कंगनाचे सहा महिन्यांपूर्वीचे लग्झरी ऑफिस आणि आताचे तोडलेले ऑफिस दिसतस आहे. हे फोटो शेअर करत तिने ‘माझं हृदय तुटलं’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा : ऐश्वर्या राय बच्चनसारखी दिसणारी ही मुलगी आहे तरी कोण?

‘मी माझी मिटींग घरी घेत आहे. आज मणिकर्णिका फिल्मसची स्थापना करणारा अक्षत रणौत माझ्यासोबत आहे. तो माझ्यावर असलेल्या ७०० केस सांभाळत आहे. त्यानेच मला ऑफिसमध्ये मिटींगसाठी येण्यास सांगितले. माझ्या ऑफिसची अशी अवस्था पाहण्यासाठी मी तयार नव्हते आणि ते पाहून माझे हृदय तुटतं’ या आशयाचे ट्वीट कंगनाने केले आहे.

मुंबई महापालिकेने १० सप्टेंबरला बेकायदेशीर बांधकामाचं कारण देत अभिनेत्री कंगनाच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. यानंतर ही कारवाई थांबवण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. दरम्यान कंगनाने अनेक घोटाळे केल्याचा आरोपही महापालिकेने केला होता. या संपूर्ण वादात कंगना आणि शिवसेना यांच्यातही आरोप आणि प्रत्यारोप झाले. दरम्यान कंगना रणौतने मुंबई महापालिकेला नोटीस बजावत आपल्या कार्यालयात झालेल्या तोडफोडीच्या नुकसानीची भरपाई म्हणून २ कोटींचीही मागणी केली होती.

कगंना लवकरच ‘थलाइवी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकारणार आहे. तसेच तिचा ‘धाकड’ हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2021 1:20 pm

Web Title: kangana ranaut visits her demolished mumbai office after 6 months avb 95
Next Stories
1 “अरे, तुझे कपडे कुठे गेले?” चाहत्यांचा जॉनला सवाल
2 भूमीने शेअर केले सुशांतचे फोटो; जुन्या आठवणींना उजाळा
3 दीपिका पदूकोणचं डेली रुटीन काय असेल? चला जाणून घेऊया
Just Now!
X