News Flash

‘आमच्या घरी लक्ष्मी आली’ ; वहिनीसाठी कंगनाची खास पोस्ट

वहिनीसाठी कंगनाची खास पोस्ट; म्हणाली...

आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे कायम चर्चेत येणारी अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत. अलिकडेच कंगनाच्या भावाचा अक्षतचा विवाहसोहळा पार पडला. या सोहळ्यातील प्रत्येक फोटो, व्हिडीओ कंगनाने सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर आता तिने तिच्या वहिनीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून तिने वहिनी म्हणजे लक्ष्मी असल्याचं म्हटलं आहे.

दिवाळीनिमित्त कंगनाने अक्षत आणि वहिनीसोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने वहिनीच्या येण्यामुळे घरातलं वातावरण किती बदललं आहे हे सांगितलं आहे.

“दिवाळीच्या दिवसात घराघरात लक्ष्मीचं आगमन होतं. आमच्या घरीदेखील एका लक्ष्मीचं आगमन झालं आहे. आज पहिल्यांदाच आमची वहिनी घरी आली आहे. तिच्या या गृहप्रवेशाला अंदरेरा असं म्हणतात”, अशी पोस्ट कंगनाने केली आहे.


दरम्यान, कंगना लवकरच ‘तेजस’ आणि पंगा चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटांमध्ये ती महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2020 5:48 pm

Web Title: kangana ranaut welcomes sister in law on diwali photos viral on internet dcp 98
Next Stories
1 ‘आई माझी काळुबाई’ मालिकेने गाठला ५० भागांचा टप्पा
2 कतरिनाच्या धमाकेदार बेली डान्स डान्सवर व्हाल फिदा, पाहा Video
3 ‘महिलांना वय विचारु नका’; ३२ वर्षांची स्वरा स्वत:चं वय सांगते २५; कारण…
Just Now!
X