News Flash

“या सिनेमासाठी माझ्याहून उत्तम दिग्दर्शक कुणी असूच शकत नाही”; कंगना रणौतचा नवा दावा

हा सिनेमा इंदिरा गांधी यांची बायोपिक नसली तरी त्यांनी घेतलेल्या दोन महत्वाच्या निर्णयाभोवती या सिनेमाची कथा गुंफण्यात आलीय.

(File Photo/Knagana Ranaut)

आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्तेत राहणारी बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत सध्या तिच्या ‘इमर्जन्सी’ या सिनेमामुळे चांगलीच चर्चेत आलीय. या सिनेमात कंगना देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. या सिनेमासाठी कंगनाने तयारी देखील सुरु केलीय. नुकतेच कंगनाने काही फोटो शेअर केले होते. मात्र या सिनेमात अभनिय करण्यासोबतच कंगना सिनेमाचं दिग्दर्शन देखील करणार आहे. ”इमर्जन्सी’ सिनेमाचं दिग्दर्शन तिच्याहून उत्तमरित्या कुणीही करू शकतं नाही असं कंगनाचं म्हणणं आहे.

या सिनेमाबद्दल सांगताना कंगना म्हणाली, “पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या खुर्चीवर बसल्याचा आनंद होतोय. ‘इमर्जन्सी’ या सिनेमावर एक वर्ष काम केल्यानंतर शेवटी माझ्या हे लक्षात आलंय की या सिनेमासाठी माझ्याहून उत्तम दिग्दर्शक कुणीच असू शकत नाही. मी लेखक रितेश शाह यांच्यासोबत काम करतेय. हा सिनेमा तयार करण्यासाठी मला एखाद्या अ‍ॅक्टिंग प्रोजेक्टकडे पाठ फिरवावी लागली तरी ते मला मान्य आहे. मी खूपच जास्त उत्साही आहे. हा खूप सुंदर प्रवास असेल. एका वेगळ्यांच भूमिकेत माझी भरारी.” असं कंगना तिच्या पोस्टमध्ये म्हणालीय.

kangara-post (Photo-kooapp/Kangana ranaut)

पहा फोटो: किती आहे कार्तिक आर्यनची कमाई?; मुंबईत घर आणि ‘या’ आलिशान गाड्यांचा आहे मालक

वर्षाच्या सुरुवातीलाच कंगना रणौतने तिच्या पोस्टमध्ये या सिनेमाची तयारी पूर्ण होत आल्याचं म्हंटलं होतं. हा सिनेमा इंदिरा गांधी यांची बायोपिक नसली तरी त्यांनी घेतलेल्या दोन महत्वाच्या निर्णयाभोवती या सिनेमाची कथा गुंफण्यात आलीय. त्याकाळातील पॉलिटिकल ड्रामा या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

हे देखील वाचा: ‘थ्री इडियट्स’ सिनेमानंतर नैराश्यात गेला होता अभिनेता अली फजल; ११ वर्षांनंतर सांगितलं कारण

येत्या काळात कंगना ‘तेजस’, ‘धाकड़’ आणि ‘थलाइवी’ या सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रत्येक सिनेमात कंगनाचा वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2021 7:31 pm

Web Title: kangana ranaut will director for her upcoming film emergency based on former pm indira gandhi kpw 89
Next Stories
1 Filhall 2 Song: अक्षय कुमार-नुपुर सेननचं ‘फिलहाल 2’ गाण्याचा फर्स्ट लूक रिलीज
2 बॉलिवूडच्या किंग खानने उडवली होती बिग बींची खिल्ली; म्हणाला…
3 बिग बॉस १५ मध्ये राखी सावंतला पतीसोबत करायची आहे एन्ट्री…; “म्हणाली, शोमध्ये गेल्यावर तरी सुधरतील…”
Just Now!
X