बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना रणौत कानच्या रेड कार्पेटवर झळकणार आहे. पहिल्यांदाच या आंतरराष्ट्रीय सोहळ्यासाठी कंगना उपस्थित राहणार आहे. कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये कंगनाचा सहभाग असल्यानं चाहतेही खूश झाले आहेत. गेल्यावर्षी दीपिकानं या सोहळ्यासाठी उपस्थिती लावली होती. यावर्षी ऐश्वर्यासोबत, कतरिना, दीपिका, मल्लिका या देखील रेड कार्पेटवर दिसणार आहेत.

ग्रे गुस या लक्झरी लिकर ब्रँडची सदिच्छादूत म्हणून कंगना या सोहळ्यासाठी उपस्थिती लावणार आहे. पुढील महिन्यात ८ ते १९ मेच्या दरम्यान कान फिल्म फेस्टीव्हल पार पडणार आहे. या सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी कंगना उत्सुक आहे. ‘भारतीय सिनेमांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मिळणारी नवी ओळख पाहून मी खूश आहे. ‘ असं कंगना म्हणाली.

सध्या कंगना ‘मणकर्णिका’च्या चित्रिकरणात व्यग्र आहे. हा चित्रपट एप्रिलमहिन्यातच प्रदर्शित होणार होता पण काही कारणानं या चित्रपटचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.