News Flash

कंगनाने चाहत्यांना दिल्या गुढीपाडवा आणि नवरात्रीच्या शुभेच्छा

कंगनाचं हे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे.

(Photo credit : kangana ranaut rwitter)

गुढीपाडवा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. मराठी लोकांसाठी ही नवीन वर्षाती सुरूवात असते, आज सगळे नवीन वर्षांची नवीन धोरणे ठरवतात. तर दक्षिण भारतात आज उगाडी हा सण नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो. त्याच निमित्ताने बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रनौतने तिच्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कंगना तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असते. मात्र, आज नवीन वर्षांच्या शुभेच्छा देतानाचे कंगनाचे रुप पाहून सगळे आश्चर्यचकित झाले आहे.

कंगना सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. कंगनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कंगनाने ट्विट करत काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये कंगनाने पारंपरिक पोशाख परिधान केल्याचे दिसत आहे. कंगनाने गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे. तिने नथ आणि सुंदर सोन्याचे दागिने परिधान केले आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये कंगनाच्या हातात देवीचा फोटो असून त्यांचे आशीर्वाद घेत असल्याचे दिसत आहे. “गुढीपाडवा, नवरात्र, नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. ज्या देवीचा फोटो मी हातात धरलेला आहे. हा फोटो मला आईने घर सोडताना दिला होता. मी खूप काही गमावले परंतु ही माझ्यासोबत राहिली, माझा विश्वास आहे की ही माझे पालन करते किंवा माझ्यावर लक्ष ठेवते, या नवरात्रीला काय केलं पाहिजे हे तुम्हाला माहित नाही तर, तुमच्या आईची पूजा करा आणि तिचा आशीर्वाद घ्या,” अशा आशायाचे कॅप्शन तिने ते फोटो शेअर करत दिले आहे.

काही दिवसांपूर्वी कंगनाच्या ‘थलायवी’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात कंगना दिवंगत अभिनेत्री आणि तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘थलायवी’ या चित्रपटातीलं पहिलं गाणं हे २ एप्रिल रोजी प्रदर्शित झालं. हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक ए.एल. विजय आहेत. या चित्रपटा व्यतिरिक्त कंगना लवकरच ‘तेजस’ आणि ‘धाकड’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2021 4:48 pm

Web Title: kangana ranaut wishing her fans by sharing some photo on gudipadwa navratri newyear dcp 98
Next Stories
1 कार्तिक आर्यन म्हणतो, “मी उठू की लॉकडाऊन लागणार आहे?”
2 ‘बिग बुलचा चांगला रिव्ह्यू देण्यासाठी अभिनेत्रीला पैसे दिले का?’ म्हणणाऱ्याला अभिषेकचे भन्नाट उत्तर
3 RRR सोबतच प्रभासच्या ‘राधे श्याम’चे दुसरे पोस्टर प्रदर्शित
Just Now!
X