News Flash

कंगनासोबतचा वाद विसरून आदित्य पांचोलीने पाहिला ‘सिमरन’!

वाचा, चित्रपट पाहिल्यानंतर काय म्हणाला आदित्य पांचोली

कंगना रणौत, सिमरन, आदित्य पांचोली, झरीना वहाब

हृतिक रोशन, आदित्य पांचोली आणि अध्ययन सुमन यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कंगना गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होती. शुक्रवारी सर्वत्र प्रदर्शित झालेल्या तिच्या ‘सिमरन’ चित्रपटामुळे ती आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. समीक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळालेल्या कंगनाचा ‘सिमरन’ चित्रपट पाहण्यासाठी चक्क तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर आदित्य पांचोली त्याच्या पत्नीसह चित्रटपगृहात पोहचला होता.

वाचा : शिल्पा शेट्टीच्या स्कार्फची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

अभिनेत्री कंगना रणौतने ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात आदित्य आणि त्याची पत्नी झरीना वहाब यांच्यावर अनेक आरोप केले होते. कंगनाने गंभीर आरोप केले असतानाही आदित्य तिचा चित्रपट पाहायला गेल्याने साहजिकच चर्चा तर होणारच ना. यासंबंधी ‘स्पॉटबॉय’ वेबसाइटशी बोलताना आदित्य म्हणाला की, तुम्ही पराचा कावळा करत आहात. मी एका सामान्य प्रेक्षकाप्रमाणे चित्रपट बघायला गेलो. एकाच गोष्टीला बराच काळ खेचणाऱ्यांपैकी मी नाही. कंगनाचा हा चित्रपट हिट होऊ दे, अशीच माझी इच्छा आहे. मला कधीच तिच्या यशाचा मत्सर वाटणार नाही.

वाचा : ..आणि आजींनी तिच्यासोबत सेल्फी काढला

‘सिमरन’ची कथा ही अमेरिकेत राहणाऱ्या घटस्फोटीत प्रफुल पटेल (कंगना रणौत) या मुलीची आहे. एका हॉटेलमध्ये हाऊसकिपींगचे काम करणारी प्रफुल आपल्या आई-वडिलांसोबत राहत असते. तिच्या आई-वडिलांना तिने दुसरे लग्न करावे असे वाटते, पण प्रफुलचा नात्यांवरचा विश्वास उडालेला असतो. ती आपल्या मैत्रिणीला भेटायला एकदा लास वेगासला जाते. तिथे एका कसिनोमध्ये जाऊन ती सुरुवातीला थोडे फार पैसे तर जिंकते पण नंतर मात्र जिंकलेले सर्व पैसे हरते. एवढेच काय तर लोकांकडून उधारीने घेतलेले पैसेही ती हरते. लोकांची उधारी फेडण्यासाठी प्रफुल चोरी करायला लागते. ती अमेरिकेतील बँका लुटते. या सगळ्या घटनांमुळे तिच्या आयुष्यात नवनवीन वळणं येत जातात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2017 3:35 pm

Web Title: kangana ranauts ex lover aditya pancholi and his wife zarina wahab watch simran
Next Stories
1 शिल्पा शेट्टीच्या स्कार्फची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!
2 VIDEO : सलमान-अहिलची ‘ब्रेकफास्ट’ डेट
3 VIDEO : मद्यधुंद अवस्थेत मोदींविरोधात बरळला हा अभिनेता
Just Now!
X