वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतवर आज दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कंगनाच्या आजोबांचं निधन झालं आहे. ते ९० वर्षांचे होते. वृद्धापकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली. कंगनाने ट्विटच्या माध्यमातून ही दु:खद बातमी आपल्या चाहत्यांनी दिली. चाहत्यांनी देखील सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अवश्य पाहा – “हॅण्डल विथ केअर नाहीतर…”; स्ट्रिपलेस फोटो शेअर करत क्रितीने दिला इशारा

आजोबांचा एक जुना फोटो शेअर करत आपण आजोबांना प्रेमानं ‘डॅडी’ म्हणूनही हाक मारायचो, अशी एक आठवण तिने सांगितली. “आज संध्याकाळी मी आईवडिलांच्या घरी गेले. मागील दोन महिन्यांपासून माझ्या आजोबांची प्रकृती ठीक नव्हती. मी घरी पोहोचले, पण त्यापूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतलेला होता.” अशा आशयाचं ट्विट करुन कंगनाने आपलं दु:ख व्यक्त केलं.

अवश्य पाहा – “आम्ही अन्नदाता आहोत दहशतवादी नाही”; शेतकरी आंदोलनावरुन अभिनेत्याचा केंद्राला टोला

अवश्य पाहा – प्रियांकाचा ग्लॅमरस लूक पाहून हृतिक झाला घायाळ; म्हणाला, तू तर…

यापूर्वी कंगना हृतिक रोशनमुळे चर्चेत होती. हृतिकने सायबर पोलिसांकडे केलेल्या तक्रोरीवरून नोंद गुन्ह्य़ाचा तपास गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाकडे वर्ग करण्यात आला. या वृत्तास मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दुजोरा दिला. २०१६ मध्ये हृतिकच्या नावाचा वापर करून बनावट ईमेल खाते तयार करून त्याद्वारे अभिनेत्री कंगना रणौतशी संवाद साधण्यात आल्याची तक्रार हृतिकने दाखल केली होती. त्यानुसार अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवून सायबर पोलिसांनी तपास सुरू केला. या घडामोडीनंतर हृतिक आणि कंगना यांनी एकमेकांविरोधात बऱ्याच तक्रोरी दाखल केल्या. दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप घडले. अलिकडेच हृतिकच्या वकिलांनी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना पत्र लिहून या प्रकरणाचा तपास पुढे न्यावा, अशी विनंती केली.