News Flash

कंगनाला धक्का, सोनू सूदनंतर ‘या’ अभिनेत्रीनेही सोडला चित्रपट

हा चित्रपट २५ जानेवारी २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बॉलिवूड क्वीन कंगना रणौत सध्या तिच्या आगामी ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. काही दिवसापूर्वी अभिनेता सोनू सूदने हा चित्रपट सोडल्याचं समोर आलं. त्यानंतर आता अाणखी एका अभिनेत्रीने हा चित्रपट सोडल्याची समोर आलं आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या मार्गातील अडथळे काही केल्या दूर होत नाहीयेत.

काही दिवसापूर्वी अभिनेता सोनू सूदने तडकाफडकी कंगनाचा हा चित्रपट सोडल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता अभिनेत्री स्वाती सेमवालनेही या चित्रपटातून काढता पाय घेतला आहे. या चित्रपटामध्ये स्वातीने पार्वती (सदाशिवराव भाऊंची पत्नी) ही व्यक्तीरेखा साकारताना दिसत होती. गेल्या काही दिवसापासून स्वाती हा चित्रपट सोडणार अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र या वृत्ताला दुजोरा मिळाला नव्हता. मात्र आता स्वातीने स्वत: या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

 

View this post on Instagram

 

#notsoelegant #manikarnika #movies #actor #writersofinstagram #director #love #film #jhansi #queen

A post shared by Swati Semwal (@semwalswati) on

दरम्यान, ‘सोनू सूदने चित्रपट सोडल्यानंतर माझ्या भूमिकेला म्हणावं तसं महत्व राहिलं नव्हतं. त्यामुळे मी माझ्या टीमशी चर्चा केली. या चर्चेनंतरच मी हा चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला आहे’, असं स्वातीने सांगितलं.  हा चित्रपट २५ जानेवारी २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटात कंगनाबरोबरच अंकिता लोखंडे, अतुल कुलकर्णी यांसारखे प्रसिद्ध मराठी चेहरेही दिसणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2018 2:34 pm

Web Title: kangana ranauts manikarnika after sonu sood this actress quits film
Next Stories
1 Video : जैसलमेरमधील अक्षयचा ‘हा’ व्हिडिओ पाहिलात का ?
2 तनुश्री दत्ताबद्दल राखी सावंत म्हणते…
3 Bigg Boss 12 : …म्हणून आम्हाला घराबाहेर पडावं लागलं
Just Now!
X