News Flash

कंगनाच्या बहिणीची टिवटिव बंद; फराह खानने मानले ट्विटरचे आभार

ट्विटरने कंगनाच्या बहिणीचं आकाऊंट केलं सस्पेंड

कंगना रणौतची बहीण रंगोली चंडेल

अभिनेत्री कंगना रणौतची बहीण रंगोली चंडेल हिचे ट्विटर अकाऊंट काही काळासाठी बंद (सस्पेंड) करण्यात आले आहे. ट्विटरचे नियम मोडल्याने ही कारवाई करण्यात आली. मात्र या कारवाईवरुन अभिनेता संजय खान यांची मुलगी फराह खान अली हिने रंगोलीवर उपरोधिक टोला लगावला आहे. तिने ट्विटरला धन्यवाद केलं आहे.

नेमकं काय म्हणाली फराह?

“रगोलीचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यासाठी धन्यवाद ट्विटर. ती काही ठराविक समुदायांना लक्ष करत होती. त्यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करत होती.” अशा आशयाचे ट्विट फराह खान अली हिने केले आहे. तिचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

रंगोली आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असते. ट्विटरद्वारे ती अनेकदा इतरांवर आरोप-प्रत्यारोप, टिकाटिप्पणी करताना दिसते. मात्र ते करताना ट्विटरच्या नियमांकडे तिने दुर्लक्ष केलं.

गेल्या काही दिवसांपासून ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल ट्विट केल्याने चर्चेत होती. ‘महाराष्ट्राला सक्षम नेतृत्वाची गरज आहे’,असं म्हणत तिने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. आता ट्विटरवर अकाऊंट सस्पेंड केल्यानंतर रंगोली व कंगना रणौत या दोघींची नावं ट्रेण्ड होत आहेत. काहींनी रंगोलीला पाठिंबा देत तिची काय चूक आहे, असा प्रश्न विचारला तर काहींनी तिचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड केल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 6:14 pm

Web Title: kangana ranauts sister rangoli chandels twitter account suspended mppg 94
Next Stories
1 गॅरेजमधील टेलरनं शिवला होता सुष्मिताचा ‘मिस इंडिया’चा ड्रेस
2 अभिनय पाहून टिक-टॉक गर्लला दिली चित्रपटाची ऑफर, नंतर केलं ट्विट डिलिट
3 रामायणीतील लक्ष्मणाचा जुना फोटो होतोय व्हायरल, पाहून नेटकरी पडले प्रेमात
Just Now!
X